भारताविरुद्धच्या टी-20मध्ये गेलचं कमबॅक
भारतविरुद्धच्या एमकेव टी-20मध्ये वेस्ट इंडिजनं ख्रिस गेलची निवड केली आहे.
मुंबई : भारतविरुद्धच्या एमकेव टी-20मध्ये वेस्ट इंडिजनं ख्रिस गेलची निवड केली आहे. तब्बल वर्षभरापेक्षाही जास्तच्या काळानंतर गेल वेस्ट इंडिजकडून खेळताना दिसणार आहे. मागच्या वर्षी भारतात झालेल्या टी-20 वर्ल्ड कपनंतर ख्रिस गेल आंतरराष्ट्रीय सामना खेळला नव्हता.
भारत-वेस्ट इंडिजविरुद्धच्या हा सामना ९ जुलैला होणार आहे. गेलबरोबरच वेस्ट इंडिजच्या टीममध्ये पोलार्ड, सुनील नारायण, मार्लोन सॅम्युअल्स आणि जेरॉम टेलरची निवड करण्यात आली आहे. कार्लोस ब्रॅथवेटकडे वेस्ट इंडिजच्या टीमचं कर्णधारपद देण्यात आलं आहे.
५ वनडे आणि एक टी-20ची सीरिज खेळण्यासाठी भारत वेस्ट इंडिज दौऱ्यावर आहे. या दौऱ्यातल्या पहिल्या मॅचमध्ये पाऊस पडला तर दुसऱ्या आणि तिसऱ्या वनडेमध्ये भारताचा विजय झाला. चौथ्या वनडेमध्ये वेस्ट इंडिजनं मॅच जिंकत सीरिजमधलं त्यांचं आव्हान कायम ठेवलं आहे.