सिक्सर किंग क्रिस गेलची शाहिद आफ्रिदीच्या रेकॉर्डशी बरोबरी
बांगलादेशविरुद्धच्या वनडे सीरिजमध्ये वेस्ट इंडिजचा २-१नं पराभव झाला.
मुंबई : बांगलादेशविरुद्धच्या वनडे सीरिजमध्ये वेस्ट इंडिजचा २-१नं पराभव झाला. याच सीरिजच्या शेवटच्या मॅचमध्ये क्रिस गेलनं शाहिद आफ्रिदीच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे. बांगलादेशविरुद्धच्या तिसऱ्या वनडेमध्ये गेलनं ६६ बॉलमध्ये ७३ रनची खेळी केली. या खेळीमध्ये ५ सिक्सचा समावेश होता. याचबरोबर गेलनं शाहिद आफ्रिदीच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधल्या सर्वाधिक सिक्सची बरोबरी केली. क्रिस गेल आणि शाहिद आफ्रिदीनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ४७६ सिक्स मारले आहेत. गेलनं ४४३ मॅचमध्ये तर आफ्रिदीनं ५२४ मॅचमध्ये एवढे सिक्स मारले आहेत.
गेल आफ्रिदीचं रेकॉर्ड मोडणार
वनडे सीरिजनंतर आता वेस्ट इंडिज आणि बांगलादेशमध्ये १ ऑगस्टपासून ३ टी-२० मॅचच्या सीरिजला सुरुवात होणार आहे. या सीरिजमध्ये गेल आफ्रिदीचं रेकॉर्ड मोडू शकतो.
शाहिद आफ्रिदीनं वनडेमध्ये ३५१, आंतरराष्ट्रीय टी-२०मध्ये ७३ आणि टेस्टमध्ये ५२ सिक्स लगावले होते. तर गेलनं वनडेमध्ये २७५, टी-२०मध्ये १०३ सिक्स आणि टेस्टमध्ये ९८ सिक्स मारले आहेत. या यादीमध्ये भारताचा महेंद्रसिंग धोनी पाचव्या क्रमांकावर आहे. धोनीनं ५०४ मॅचमध्ये ३४२ सिक्स लगावले आहेत.