IPL 2023, CSK vs LSG Match 6: आयपीएलचा सहावा सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि लखनऊ जायन्ट्समध्ये (Chennai Super Kings vs Lucknow Super Giants) खेळला जाणार आहे. या सामन्यात एम एस धोनी (MS Dhoni) आणि के एल राहूल (KL Rahul) हे दोन कॅप्टन कुल भिडणार आहे. त्यामुळे आता सर्वांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. काइल मेयर्स आणि निकोलस पूरन यांना उत्तर म्हणून मोईन अलीला सीएसकेच्या (CSK) संघात कायम ठेवण्याची शक्यता आहे. मिशेल सँटनर आणि रवींद्र जडेजा यांना लखनऊचे फलंदाज कसे खेळतील? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. लखनऊ (LSG) कृष्णप्पा गौथमला संधी देणार का? याची उत्सुकता लागली आहे. त्याला एम्पॅक्ट प्लेयर म्हणून देखील उतरवू शकतात. अनुकूल परिस्थितीत त्यांच्या फिरकी तोफखान्यात भर घालण्यासाठी त्याला संघात स्थान देण्याची शक्यता आहे.


कसं असेल पिच?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गेल्या महिन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकदिवसीय मालिकेतील निर्णायक सामना याच मैदानावर खेळला गेला होता. याच खेळपट्टीवर फिरकीपटूंनी 20 पैकी 11 विकेट घेतले होते. त्यामुळे आजच्या मॅचमध्ये फिरकीची जादू दिसणार का ? हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.


इतिहास काय सांगतो?


लखनऊने क्विंटन डी कॉक आणि एविन लुईस यांच्या अर्धशतकांच्या जोरावर मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियमवर सीएसकेविरुद्ध 210 धावांचा यशस्वी पाठलाग केला होता. त्यामुळे आजच्या मॅचमध्ये चेन्नईचा संघ बदला घेणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.



कसा असेल CSK चा संघ ?


डेव्हॉन कॉनवे, ऋतुराज गायकवाड, मोईन अली, बेन स्टोक्स, अंबाती रायुडू, रवींद्र जडेजा, शिवम दुबे/प्रशांत सोलंकी, एमएस धोनी, दीपक चहर, मिचेल सँटनर, राजवर्धन हंगरगेकर.


आणखी वाचा - IPL 2023 Points Table: कोणती टीम अव्वल स्थानावर? 'या' 5 संघांनी फोडला भोपळा!


कसा असेल LSG चा संघ ?


केएल राहुल, काइल मेयर्स, निकोलस पूरन, मार्कस स्टोइनिस, दीपक हुडा, कृणाल पंड्या, आयुष बडोनी/के गौथम, मार्क वुड, जयदेव उनाडकट, रवी बिश्नोई, आवेश खान.