India vs New Zealand : धर्मशालाच्या निसर्गरम्य मैदानावर भारत आणि न्यूझीलंड यांच्या सामना खेळवला जात आहे. या सामन्यात न्यूझीलंडने दिलेल्या 274 धावांचं आव्हान पार करताना टीम इंडियाची दमदार सुरूवात झालीये. किवींनी 50 ओव्हरमध्ये 273 धावा उभ्या केल्या. यामध्ये डॅरिल मिचेल (Daryl Mitchell) याने 130 धावांची मजबूत खेळी केली. पहिल्या 10 ओव्हरमध्ये टीम इंडियाने न्यूझीलंडचा सुर आवळला होता. मात्र, त्यानंतर टीम इंडियाला थेट 34 व्या ओव्हरमध्ये विकेट मिळाली. शमीने (Mohammed Shami) टीम इंडियाला मोठा ब्रेक मिळवून दिला होता. मात्र, याच सामन्यात रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि विराट कोहली (Virat Kohli) यांच्यात बाचाबाची झाल्याचं समोर आलं आहे. त्याचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झालाय.


नेमकं काय झालं?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पहिल्या 10 ओव्हरमध्ये न्यूझीलंडची धावगती रोखल्यानंतर रचिन रवींद्र आणि डॅरिल मिचेल यांनी आक्रमक फलंदाजी सुरू केली. कमजोर बॉलवर हाणामारी करत दोघांनी रन्स कुटल्या. त्यानंतर त्यांनी 30 ओव्हरपर्यंत विकेट गमावली नव्हती. त्यामुळे रोहितचं टेन्शन वाढलं. रोहितने दुसरा फॉर्म्युला वापरण्यासाठी मोहम्मद शमीला बोलवलं. त्यावेळी त्याने आपल्या पद्धतीनुसार फिल्डिंग लावली होती. मात्र, विराटला ते मान्य नव्हतं. त्यानंतर विराट आणि रोहित यांच्यात बाचाबाची झाली. दोघांनी संयमाने बोलणं केलं. मात्र, रोहितने विराटचं ऐकलं नाही, असं व्हिडीओच्या अखेरीस दिसतंय. त्यामुळे विराटचा चेहरा देखील पडल्याचं दिसून आलं होतं.


पाहा Video



भारत (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा (C), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (WK), सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज.


न्यूझीलंड (प्लेइंग इलेव्हन): डेव्हॉन कॉनवे, विल यंग, रचिन रवींद्र, डॅरिल मिशेल, टॉम लॅथम (WK), ग्लेन फिलिप्स, मार्क चॅपमन, मिचेल सँटनर, मॅट हेन्री, लॉकी फर्ग्युसन, ट्रेंट बोल्ट.