Clive Lloyd Not Out 242 Runs: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तिसरा कसोटी सामना 1 नोव्हेंबरपासून मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर सुरू होणार आहे. मुंबईतील या महत्त्वपूर्ण मैदानात आजवर अनेक विक्रम झाले आहेत. असाच एक विक्रम आजही या मैदानावर उभा आहे, जो 1975 मध्ये बनला होता. हा विक्रम आजही तसाच आहे कारण सचिन तेंडुलकर, सुनील गावस्कर आणि सध्याचा अनुभवी भारतीय फलंदाज विराट कोहली यांनाही तो मोडण्यात यश आले नाही. 


कोणता विक्रम 1975 पासून आहे कायम? 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

1975 साली वानखेडे स्टेडियमवर सर्वात मोठी इनिंग खेळण्याचा विक्रम आहे. 1975 मध्ये वेस्ट इंडिजचा संघ भारत दौऱ्यावर आला होता. या दौऱ्यात अनुभवी फलंदाज क्लाइव्ह लॉईडने मुंबई कसोटी सामन्यात 242 धावांची नाबाद खेळी खेळली. या मैदानावर कोणत्याही फलंदाजाने खेळलेली ही सर्वोत्तम कसोटी खेळी आहे. या मोठ्या रेकॉर्डला आजून कोणीही मोडू शकलेलं नाही. 


टॉप फलंदाजांनाही मारता आली नाही बाजी 


भारताचे महान फलंदाज जसे की सचिन तेंडुलकर आणि सुनील गावस्कर यांना देखील वानखेडेवर कसोटीतील सर्वात मोठी खेळी खेळण्याच्या बाबतीत क्लाईव्ह लॉईडला मागे टाकू  शकले नाहीत. टीम इंडियाचा सध्याचा दिग्गज फलंदाज विराट कोहलीही आतापर्यंत हा विक्रम मोडू शकला नाही.  


दिग्गज फलंदाजांच्या सर्वोत्तम कसोटी धावसंख्या किती?


वानखेडे स्टेडियमवर मैदानावर गावसकरचा सर्वोत्तम कसोटी धावसंख्या २०५ धावा आहे. त्याचवेळी या मैदानावर सचिन तेंडुलकरचा कसोटीतील सर्वोत्तम धावसंख्या 148 धावा आहे. 2016 मध्ये लॉयडचा हा महान विक्रम विराट कोहली मोडू शकेल असं वाटत असतानाचा तो बाद झाला. त्याने 235 धावांची इनिंग खेळली होती.


वानखेडेवर कसोटीतील सर्वात मोठी खेळी खेळणारे टॉप-5 फलंदाज कोण? 


क्लाइव्ह लॉईड - २४२ धावा*
विराट कोहली - 235 धावा
विनोद कांबळी - 224 धावा
सुनील गावस्कर - 205 धावा
एल्विन कल्लीचरण – 187 धावा


तिसऱ्या कसोटीत हा विक्रम कोण मोडू शकतो? 


भारतीय टीममध्ये असे नेक फलंदाज आहेत, जे हा मोठा विक्रम मोडू शकतील. हा रेकॉर्ड जर एखाद्या खेळाडूने मोडला तर तो या मैदानावर सर्वात मोठी कसोटी खेळी खेळणारा क्रिकेटर बनू शकतो. यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, रोहित शर्मा, विराट कोहली, सरफराज खान यांच्याकडून तिसऱ्या कसोटीत हे मोठी खेळी खेळून हा विक्रम मोडू शकतात अशी शक्यता वर्तवली जात आहे.