मुंबई : टीम इंडियाने 3 एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात इंग्लंडचा 10 विकेट्स राखून पराभव करत मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. या सामन्यात टॉस जिंकून भारतीय कर्णधार रोहित शर्माने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेला इंग्लंडचा संघ अवघ्या 110 धावांवर गारद झाला. तर सामन्यादरम्यान खेळाडूंना स्टेडियममध्ये चक्क उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचं दर्शन झालं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टीम इंडियाकडून रोहित शर्मा आणि शिखर धवनच्या जोडीने 18.4 ओव्हरमध्ये 114 रन्स करत लक्ष्य गाठलं आणि टीम इंडियाला सहज विजय मिळवून दिला. या मॅचमध्ये एक व्हिडिओही दिसला ज्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी नाही तर यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ दिसत होते.


पंतप्रधान नरेंद्र मोदी जर जगभर प्रसिद्ध आहेत, तर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या चाहत्यांची कमी नाही. होय, योगीजींचा एक चाहता बुलडोझरचा फोटो घेऊन ओव्हल मैदानावर पोहोचला आणि त्याने या व्हायरल व्हिडिओमध्ये योगीजींचं जोरदार कौतुकही केलं आहे.



सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असलेल्या एका व्हिडिओमध्ये हा चाहता म्हणतो की, तो उत्तर प्रदेशचा असून त्याचे नाव राहुल शर्मा आहे. तो इंग्‍लंडमध्‍ये इंजिनियर म्हणून काम करतो. राहुल योगी आदित्यनाथ यांचा खूप मोठा चाहता आहे, याचा अंदाज तुम्ही हा व्हिडिओ पाहून सहज लावू शकता.


टीम इंडियाचा विजय


टीम इंडियाकडून रोहित शर्माने सर्वाधिक नाबाद 76 धावांची खेळी केली. यामध्ये रोहितने 6 चौकार आणि 5 खणखणीत सिक्स ठोकले. तर शिखर धवनने 54 बॉलमध्ये 31 धावांची संयमी खेळी करत रोहितला चांगली साथ दिली.


त्याआधी जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीपुढे इंग्लंडने गुडघे टेकले. बुमराहने इंग्लंडच्या 6 फलंदाजांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. विशेष म्हणजे बुमराहने 6 पैकी 3 फलंदाजांना शून्यावर बाद केलं.