अबुधाबी : चेन्नई सुपर किंग्जचा प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंगने कोलकाता विरुद्धच्या सामन्यात पराभवासाठी केदार जाधवला जबाबदार धरलं आहे. तो म्हणला की, 'केदार जाधवला कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या लक्ष्याचा पाठलाग करताना रवींद्र जडेजा आणि ड्वेन ब्राव्हो यांच्या आधी पाठवले होते. कारण तो स्पिनर्सला चांगलं खेळतो. पण जाधवने 12 चेंडूत फक्त 7 धावा केल्या.'


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

फ्लेमिंगने सामन्यानंतर पत्रकार परिषदेत म्हटलं की, 'आम्हाला वाटले की केदार फिरकी गोलंदाजांचा चांगला सामना करेल आणि धावा करेल तर जडेजा फिनिशर म्हणून काम करेल, पण तसे झाले नाही. आम्हाला खूप आत्मपरीक्षण करावे लागेल'. 11 व्या आणि 14 व्या ओव्हरमध्ये फक्त 14 रन आल्याने मॅच वरील पकड गमवली.'


"जर शेन वॉटसन किंवा अंबाती रायुडू नाबाद असते तर चित्र वेगळं असतं. आम्ही वेगवान धावा करू शकलो नाही आणि सामन्यावरील पकड गमवत गेलो.'


सुरेश रैना नसल्याने त्याची कमतरता जाणवते. परंतु फ्लेमिंग म्हणाला की, आमच्याकडे संतुलित संघ आहे. आमच्याकडे बरेच फलंदाज आहेत आणि संघ संतुलित आहे. मला वाटत नाही की अतिरिक्त फलंदाज मदत करेल.'


फिरकी गोलंदाज रवींद्र जडेजाला गोलंदाजी न देण्याच्या प्रश्नावर तो म्हणाला की, हा प्रश्न एमएस धोनीचा आहे. मी हे निर्णय घेत नाही. माझ्या मते हा निर्णय वारा पाहून घेण्यात आला असेल. तसेही आमचे मध्यम वेगवान गोलंदाज चांगले काम करत होते '.


चेन्नईचा या सामन्यात फक्त 10 रनने पराभव झाला.