टी-२० महिला वर्ल्ड कप फायनलसाठी आलेल्या प्रेक्षकाला कोरोनाची लागण
मेलबर्न क्रिकेट ग्राऊंड मॅनेजमेंटची माहिती...
मेलबर्न : टी-२० महिला वर्ल्ड कपच्या फायनल मॅचदरम्यानची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ऑस्ट्रेलियातल्या मेलबर्नमध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात फायनलची मॅच खेळली गेली. ही मॅच पाहायला आलेल्या प्रेक्षकांपैकी एकाला कोरोनाची लागण झाली होती, अशी माहिती आता समोर आली आहे. मेलबर्न क्रिकेट ग्राऊंड मॅनेजमेंटनेच ही माहिती दिली आहे.
दरम्यान, आयपीएलच्या आयोजनांवर कोरोनाचं सावट आहे. त्यासंदर्भात निर्णयासाठी आता शनिवारी निर्णय होणार आहे. आयपीएलच्या गव्हर्निंग काऊंसिलची बैठक शनिवारी होणार आहे. या बैठकीत आता काय निर्णय होतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तसेच आयपीएलच्या तिकीट विक्रीवर सरकारकडून बंदी येण्याची शक्यता आहे.
राज्य सरकारने आयपीएल स्पर्धेबाबत अजून निर्णय घेतला नाही. गर्दी टाळली गेली पाहीजे ही सरकारची भूमिका असल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे. आयपीएलबाबत योग्य तो निर्णय लवकरात लवकर घेऊ असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. याबाबत सभागृहातही निवेदन केलं जाण्याची शक्यता आहे.