मुंबई :  आयपीएल 2021 च्या सामन्यांवर कोरोनाचा धोका वाढू लागला आहे. आयपीएल २०२१ सुरू होण्यापूर्वीच  KKR चा खेळाडू नितीश राणा कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे वृत्त आहे. दैनिक भास्करच्या सूत्रांच्या माहितीनुसार, केकेआर काही दिवसासाठी सुट्टी घेऊन गोव्याला फिरायला गेला होता. सुट्टीनंतर पुढील सामने खेळण्यासाठी तो परत आला होता. मात्र, दोन दिवसांपूर्वी त्याचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. मात्र अद्याप बीसीसीआय आणि केकेआरकडून या संदर्भात अधिकृत दुजोरा दिलेला नाही.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सुत्राच्या माहितीनुसार KKR चा तो फंलदाज मुंबईच्या एका हॉटेलमध्ये 'क्‍वारंटाइन' झाला आहे. डॉक्टरांची एक टीम त्याचा उपचार करत आहे. आयपीएलच्या 14 व्या सत्राची सुरुवात 9 एप्रिलपासून सुरु होत आहे. ज्यात कोलकाता नाइट रायडर्डर 11 मार्च रोजी हैदराबादला पहिला सामना खेळणार आहे.


आयपीएल 2020 राणासाठी सर्वात वाईट वर्ष.
2020 आयपीएल सत्र नीतीश राणासाठी खूप वाईट काळ होता. कारण मागच्या सामन्यात त्याने 14 सामन्यांत 25.14 च्या सरासरीने केवळ 254 धावा केल्या होत्या. राणाच्या आयपीएलच्या संपूर्ण कारकीर्दीत 60 सामने खेळले आहेत. त्यामध्ये त्याने 28.17 च्या सरासरीने आणि 135.56 च्या स्ट्राइक रेटने 1437 धावा केल्या आहे.


विजय हजारेच्या पहिल्या 5 धावपटूंमध्ये  होते विजय हजारेच नाव


नितीश राणा सध्या खूप उत्कृष्ट खेळत आहे. विजय हजारे ट्रॉफीच्या पहिल्या 5 धावपटूंपैकी एक होते. दिल्लीकडून खेळत असताना नितीश राणाने 7 सामन्यात 66.33 च्या सरासरीने 398 धावा केल्या. यावेळी त्याचा फलंदाजीचा स्ट्राइक रेट 97.97 येवढा होता, त्यांने आजपर्यंत 1 शतक आणि 2 अर्धशतके ठोकली आहेत.


केकेआरचा सराव सुरू


केकेआरने आयपीएल 2021 च्या सामन्यासाठी सराव सुरु केला होता. या सरावादरम्यान त्यासोबत इतरही खेळाडू सराव करत असल्याचा एक फोटो त्यांनी शेअर केला आहे.


मागील सत्रातही होते कोरोनाचे मोठे सावट
आयपीएलच्या शेवटच्या सत्रातही कोरोनाचे मोठे सावट होते. त्यावेळी दीपक चाहर आणि CSKचे तुराज गायकवाड यांच्यासह ११ जणांना कोरोनाची लागण झाली होती. मात्र नंतरच्या काळात कोरोनाचे एकही प्रकरण समोर आले नाही.