Corona : `हिटमॅन`ची माणुसकी, कोरोनाशी लढण्यासाठी रोहितकडून भरभरून मदत
कोरोना व्हायरसचा सामना करण्यासाठी सर्वसामान्यांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत पंतप्रधान सहाय्यता निधी आणि मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत करत आहेत. भारताचा क्रिकेटपटू रोहित शर्मादेखील या मोहिमेत उतरला आहे.
मुंबई : कोरोना व्हायरसचा सामना करण्यासाठी सर्वसामान्यांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत पंतप्रधान सहाय्यता निधी आणि मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत करत आहेत. भारताचा क्रिकेटपटू रोहित शर्मादेखील या मोहिमेत उतरला आहे.
रोहितने पंतप्रधान सहाय्यता निधीसाठी ४५ लाख रुपये, महाराष्ट्र मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी २५ लाख रुपये, फीडिंग इंडियासाठी ५ लाख रुपये, स्ट्रे डॉग्ससाठी ५ लाख रुपये मदत केली आहे.
याआधी सचिन तेंडुलकरने ५० लाख रुपये, सुरेश रैनाने ५२ लाख रुपये, सौरव गांगुलीने ५० लाख रुपयांचे तांदूळ, अजिंक्य रहाणेने १० लाख रुपयांची मदत केली होती. तर बीसीसीआयने पंतप्रधान सहाय्यता निधीसाठी ५१ कोटी रुपये दिले होते.
सानिया मिर्झाने आतापर्यंत १.२५ कोटी रुपयांची मदत गोळा केली आहे. रोजंदारीवर काम करणाऱ्या मजुरांसाठी हा फंड वापरण्यात येणार आहे. भारतीय महिला टीमची कर्णधार मिताली राजने १० लाख रुपये, ऑलराऊंडर दिप्ती शर्माने ५० हजार रुपये पश्चिम बंगाल मुख्यमंत्री सहाय्यता निधीला द्यायचा निर्णय घेतला आहे.