ऑक्सिजन मिळवण्यासाठी सुरेश रैनाचीही धडपड, मदतीला धावून आला सोनू सूद
कोरोना साथीच्या दुसर्या लाटेमुळे भारताला मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावं लागत आहे
मुंबई: भारतात कोरोनाचं थैमान सुरू आहे. वाढत्या कोरोना रुग्णांमुळे रुग्णालयात बेड मिळत नाहीत. तर आरोग्य संस्थेवर ताण आला आहे. सुविधा अपुऱ्या पडत आहेत. कुठे ऑक्सिजन उपलब्ध होत नाहीत तर कुठे इंजेक्शन त्यामुळे लोकांचे प्राण जात असल्याच्या वेदनादायी घटना घडत आहेत. ऑक्सिजनसाठी सर्वसामन्यांसोबत आता स्टार खेळाडू आणि सेलिब्रिटींना देखील धडपड करावी लागत आहे.
अशा परिस्थितीमध्ये सोनू सूद हा सर्वसामान्यांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत प्रत्येकाचा आधार बनला आहे. आपल्या परिनं जेवढं शक्य आहे तेवढं सगळ सोनू सूद करत आहे. टीम इंडियातील माजी खेळाडू आणि चेन्नई संघातील स्टार खेळाडू म्हणून ओळखला जाणारा सुरेश रैनाला देखील सोनूने मदत केली आहे.
रैनानं सोशल मीडियावर मागितली मदत
रैनाने आपल्या घरीतील व्यक्तीसाठी ऑक्सिजनची आवश्यकता असल्याचं सोशल मीडियावर पोस्ट केलं. रैनाची काकू कोरोनाच्या विळख्यात सापडली असून सध्या तिच्यावर उपचार सुरू आहेत. ऑक्सिजनची खूप आवश्यकता असल्यानं रैनाने सोशल मीडियावर मदत मागितली. फुफ्फुसांना इंफेक्शन झाल्याचंही त्याने सोशल मीडियावर सांगितलं.
सोनू सूदकडून मदतीचा हात
सोनू सूदला हा मेसेज मिळताच त्याने रैनाला पुढच्या 10 मिनिटांत ऑक्सिजन मिळेल असेल आश्वासन दिलं. सोनूने त्याला मदतीचा हात दिला आणि त्यामुळे रैनाच्या कुटुंबातील व्यक्तीला ऑक्सिजन मिळाला आहे.
रैनाने मानले सोनू सूदचे आभार
सुरेश रैनाने ट्वीटरवर सोनू सूदचे खूप आभार मानले आहेत. ऑक्सिजन उपलब्ध होत नसल्यानं त्याने ट्वीटरवर मदत मागितली आणि सोनूने तातडीने तो मिळवून दिला. त्यामुळे रैनाने सोनी पाजी मी तुमचा खूप आभारी आहे असं म्हणत काळजी घ्या असं ट्वीट रैनानं केलं आहे.
कोरोना साथीच्या दुसर्या लाटेमुळे भारताला मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावं लागत आहे. गेल्या काही दिवसांपासून दररोज तीन लाखाहून अधिक संसर्ग होण्याच्या घटना समोर येत आहेत. महत्वाची औषधे आणि ऑक्सिजन नसल्यामुळे हे संकट अधिकच वाढले आहे. यामुळे दररोज हजारो लोक आपला जीव गमावत आहेत.