मुंबई: IPL2021मधील सामने कोरोनामुळे स्थगित झाले आहेत. त्यानिमित्तीताने धोकादायक बाउन्सर्सचे अनेक व्हिडीओ समोर येत होते. सध्या इंग्लंडमध्ये काउन्टी चॅम्पियनशिपसाठी सामने सुरू आहे. लंकाशायर विरुद्ध ग्लॅमर्गन यांच्यात सामना सुरू असताना एक अजब प्रकार घडला. चक्क स्पिनरने बॉउन्सर टाकला. तोही इतका अजब की फलंदाजाला बॉल मारायची संधीच नव्हती. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या सामन्यादरम्यान एक अजब व्हिडीओ समोर आला. मार्नस लाबुशेनने आपल्या गोलंदाजीने  फलंदाजासह त्याच्या संघातील सर्व खेळाडूंना आश्चर्यचकित केलं. मैदानात नेमकं काय घडलं हे समजायला विकेटकीपरलाही 2 मिनिटं वेळ गेला. लाबुशेन याने लेग स्पिन बाउन्सर टाकला. तो इतका उंच होता की फलंदाज मैदानात खाली वाकला आणि त्याच्या डोक्यावरून बॉल निघून गेला.



साधारण स्पिनर्स बाउन्सर्स टाकत नाहीत.मार्नस लाबुशेनने टाकलेल्या या बॉलमध्ये सर्वजण पाहात राहिले. फलंदाजाने हा बॉल खाली वाकून सोडून दिला. तर विकेटकीपरने चपळाईनं हा बॉल पकडला. या सामन्यावर पावसाचं सावट होतं त्यामुळे या सामन्याचा निकाल लागलाच नाही.