मुंबई: जगभरात कोरोनाचा कहर सुरू आहे. तर भारतात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं थैमान घातलं आहे. अपुरा सुविधांमुळे अनेकांना मोठा समस्यांचा सामना करावा लागत असतानाच आता भारतीयांसाठी देश-विदेशातून अनेक खासगी आणि विदेशी संस्थांमधून मदतीचा हात पुढे येत आहे. अनेक खेळाडू, कलाकार, उद्योगपतींनी मोठी मदत केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

IPLमधील विदेशी खेळाडूंनंतर आता क्रिकेट ऑस्ट्रेलियन बोर्डाकडून भारताला मदत करण्याबाबत घोषणा केली आहे. पॅट कमिन्स आणि ब्रेट लीनंतर क्रिकेट ऑस्ट्रेलियानेही कोरोनाविरूद्धच्या युद्धात भारताला मदत करण्यासाठी पुढे आले आहे. त्यांनी युनिसेफ कोविड -19 रिलीफ फंडाला 50 हजार ऑस्ट्रेलियन डॉलर्स दान केले आहेत. 



या रकमेचा उपयोग रुग्णांना ऑक्सिजन, कोव्हिड- 19 चाचणी किट देण्यासाठी करण्यात येणार आहे. काही दिवसांपूर्वी ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज कमिन्सनेही पीएम केअर फंडमध्ये ऑक्सिजन पुरवठ्यासाठी 37 लाख रुपयांची मदत केली होती.


देशात कोरोनाचा कहर सुरू आहे. ऑक्सिजन, बेड्स, आणि पीपीई कीट्सची कमतरता भासत असल्याने रुग्णांना अनेक अडचणी येत आहेत. अशा परिस्थितीमध्ये क्रिकेट ऑस्ट्रेलिया बोर्डानं देखील आर्थिक मदत करण्यासाठी हात पुढे केला आहे.