मुंबई : क्रिकइन्फो या लोकप्रिय संकेतस्थळाकडून जाहीर करण्यात आलेल्या दशकातील सर्वोत्तम वन-डे आणि टी-२० क्रिकेट संघाचा कॅप्टन म्हणून महेंद्रसिंग धोनीच्या नावाची घोषणा करण्यात आलीये. तर टेस्टच्या कॅप्टनपदी विराट कोहलीच्या नावाची घोषणा करण्यात आलीये. केवळ विराट कोहली आणि दक्षिण आफ्रिकेचा ए बी डिव्हिलीयर्स या दोघांचा तिन्ही फॉरमॅटच्या टीममध्ये समावेश आहे. महिलांमध्ये भारताची कॅप्टन मिताली राज आणि फास्ट बॉलर झुलन गोस्वामी यांचा वन-डे आणि ट्वेंटी- 20 या दोन्ही टीममध्ये समावेश करण्यात आलाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

क्रिकइन्फोच्या टेस्ट टीममध्ये विराट आणि अश्विन, वनडे टीममध्ये रोहित शर्मा, विराट कोहली आणि एमएस धोनी तर टी-२० टीममध्ये कोहली, धोनी आणि बुमराह हे भारतीय खेळाडू आहेत. महिलांच्या वनडे आणि टी-२० टीममध्ये मिथाली राज आणि झुलन गोस्वामी या भारतीय आहेत. 


दशकाची टेस्ट टीम


एलिस्टर कूक, डेव्हिड वॉर्नर, केन विलियमसन, विराट कोहली (कर्णधार), स्टीव्ह स्मिथ, बेन स्टोक्स, एबी डिव्हिलियर्स, आर.अश्विन, जेम्स अंडरसन, डेल स्टेन, रंगना हेराथ


दशकाची वनडे टीम


हाशीम आमला, रोहित शर्मा, विराट कोहली, एबी डिव्हिलियर्स, रॉस टेलर, एमएस धोनी (कर्णधार), शाकीब अल हसन, ट्रेन्ट बोल्ट, मिचेल स्टार्क, लसिथ मलिंगा, इम्रान ताहीर


दशकाची टी-२० टीम


क्रिस गेल, सुनील नारायण, विराट कोहली, एबी डिव्हिलियर्स, एमएस धोनी (कर्णधार), कायरन पोलार्ड, आंद्रे रसेल, ड्वॅन ब्राव्हो, राशीद खान, लसिथ मलिंगा, जसप्रीत बुमराह


दशकाची महिलांची टीम (वनडे आणि टी-२०)


स्टेफनी टेलर, सुझी बेट्स, मेग लॅनिंग (कर्णधार), मिथाली राज, सराह टेलर, एलीस पेरी, डीनद्र डॉटिन, डेन व्हॅन निकर्क, अन्य श्रुबसोले, झुलन गोस्वामी, अनिसा मोहम्मद