Arjun Tendulkar : भारतीय क्रिकेट टीमचा दिग्गज खेळाडू सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) चा मुलगा अर्जुन तेंडुलकर (Arjun Tendulkar) गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. सध्या देशांतर्गत सुरु असलेल्या रणजी ट्रॉफी 2022-23 (Ranji Trophy) स्पर्धेत त्याने आतापर्यंत दमदार कामगिरी केली आहे. रणजी पदार्पणात शतक ठोकणाऱ्या अर्जुनने गोलंदाजीतही मैदान गाजवलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

केरळाविरुद्ध दमदार गोलंदाजी
केरळविरुद्धच्या रणजी सामन्यात (Goa vs Kerala Ranji Match) अर्जुन तेंडुलकरने पुन्हा एकदा आपल्या बॉलिंगची कमाल दाखवली आहे. टॉस जिंकून केरळाने पहिली बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. पण गोव्याच्या भेदक गोलंदाजीसमोर केरळाची इनिंग अवघ्या 265 धावांवर आटोपली. यात अर्जुन तेंडुलकरची भूमिका महत्वाची ठरली. अर्जुन आणि लक्ष्यने सहा विकेट घेतल्या. यात अर्जुनने 49 धावा देत दोन महत्वाच्या फलंदाजांना तंबूत धाडलं. 


आयपीएलमध्ये मिळणार खेळण्याची संधी
रणजी स्पर्धेतल्या कामगिरीमुळे आयपीएलमध्ये (IPL) अर्जुन तेंडुलकरसाठी मुंबई इंडियन्सचे (Mumbai Indians) दरवाजे उघडण्याची शक्यता आहे. आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स संघात अर्जुन तेंडुलकरचा समावेश आहे. पण त्याला एकदाही खेळण्याची संधी मिळालेली नाही. यावर्षीही मुंबई इंडियन्सने त्याला रिटेन केलं आहे. अर्जुन तेंडुलकरची सध्याची कामगिरी पाहता आयपीएलच्या पंधराव्या हंगामात त्याला खेळण्याची संधी मिळू शकते.


2022 वर्ष अर्जुनसाठी टर्निंग पॉईंट
2022 हे वर्ष अर्जुन तेंडुलकर (Arjun Tendulkar) च्या करियरसाठी टर्निंग पॉईंट (Terning Point) ठरलंआहे. गेल्या काही महिन्यांमध्ये अर्जुनने चांगला खेळ दाखवला आहे. गोव्याकडून प्रथम श्रेणीत देखील त्याने उत्तम खेळ केला आहे. रणजी ट्रॉफी तसंच सैय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये अर्जुनच्या नावाची चांगली चर्चा होती. 


हे ही वाचा : दिल्ली दुर्घटनेतील अंजलीच्या कुटुंबियांसाठी 'पठाण' आला धावून, आर्थिक मदतीचा हात


 


ब्यू सामन्यात अर्जुनने केलं होतं शतक
गोव्याकडून पदार्पण करताना अर्जुनने 179 चेंडूत शानदार शतक ठोकलं. गोवा विरूद्ध राजस्थानच्या सामन्यात त्याने हा पराक्रम केला होता. सातव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या अर्जुन तेंडुलकरने शानदार फलंदाजी करत विरोधी संघाला रोखून धरलं. अर्जुन तेंडुलकरने 178 चेंडूंमध्ये 12 चौकार आणि 2 षटकारांसह आपले शतक पूर्ण केलं होतं.