David Warner Record : ऑस्ट्रेलिया आणि वेस्टइंडिज दरम्यान टी20 सामना पार पडला. वेस्ट इंडिजने टॉस जिंकत ऑस्ट्रेलियाला पहिली फलंदाजी दिली. या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फलंदाज डेव्हिड वॉर्नर (David Warner) मैदानात उतरताच त्याच्या नावावर एक मोठा विक्रम जमा झाला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो केवळ तिसरा फलंदाज आहे.  वॉर्नरचा विराट कोहली (Virat Kohli) आणि रॉस टेलरच्या (Ross Taylor) एलीट क्लबमध्ये समावेश झाला आहे. वॉर्नरने या सामन्यात 36 चेंडूत 70 धावांची तुफान खेळी केली. यात त्याने 12 चौकार आणि 1 षटकार ठोकला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये समावेश
डेव्हिड वॉर्नरचा आंतरराष्ट्रीय टी20 कारकिर्दीतला हा शंभरावा सामना आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या तीनही फॉर्मेटमध्ये  100 किंवा त्यापेक्षा जास्त सामने खेळणारा खेळाडू बनला आहे (100  Matches in all Formats). टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहली आणि न्यूझीलंडचा दिग्गज फलंदाज रॉस टेलर यांच्यानंतर अशी कामगिरी करणारा तो तिसरा फलंदाज ठरला आहे. तर क्रिकेटच्या तीनही फॉर्मेटमध्ये शंभराहून अधिका सामना खेळणार ऑस्ट्रेलियाचा तो एकमेव फलंदाज आहे. 


रॉस टेलरच्या नावावर 112 कसोटी, 236 एकदिवसीय आणि 102 टी20 सामने जमाआहेत. तर विराट कोहली आपल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीत 113 कसोटी, 292 एकदिवसीय आणि 117 टी20 सामने खेळला आहे. डेव्हिड वॉर्नर 112 कसोटी, 161 एकदिवसीय आणि 100 टी20 सामने खेळला आहे. 


अशी कामगिरी करणारा पहिला फलंदाज
डेव्हिड वॉर्नर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शंभरावा कसोटी, शंभरावा एकदिवसीय आणि शंभरावा टी20 सामन्यात 50 हून अधिक धावा करणारा एकमेव क्रिकेटर आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 100 व्या कसोटी सामन्यात वॉर्नरे 200 धावा केल्या होत्या. तर100 व्या एकदिवसीय सामन्यात त्याने भारताविरुद्ध 124 धावा केल्या. आता शंभराव्या आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यात वॉर्नरने 70 धावा केल्यात. जानेवारी 2024 मध्ये वॉर्नर पाकिस्तानविरुद्ध शेवटचा आंतरराष्ट्रीय कसोटी सामना खेळला होता. 


ऑस्ट्रेलियाचा डोंगराइतका स्कोर
वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या टी20 सामन्यात डेव्हिड वॉर्नरच्या 70 धावांच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने 214 धावांचा डोंगर उभा केला. याशिवाय जोश इंग्लिसने 25 चेंडूत 5 चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 39 धावा केल्या. ग्लेन मॅक्सवेल आणि मिचेल मार्श खास कामगिरी करु शकले नाहीत. मॅक्सवेलने 10 तर मार्शने 16 धावा केल्या. मॅथ्यू वेडने 21 धावा केल्या.