India Senior Women Central Contracts List : बीसीसीआयने (BCCI) गेल्या महिन्यात भारतीय पुरुष क्रिकेटर्सच्या वार्षिक कराराची (Central Contracts) यादी जाहीर केली होती. आता भारतीय महिला क्रिकेटर्सच्या वार्षिक कराराची यादी जाहीर करण्यात आली आहे. नव्या सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट लिस्टमध्ये एकुण 17 खेळाडूंचा समावेश करण्यात आला असून तीन ग्रेडमध्ये (Grade) त्यांची विभागणी करण्यात आली आहे. ग्रेड ए मध्ये भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर (Harmanpreet kaur), सलामीची आक्रमक फलंदाज स्मृती मंधाना  (Smriti Mandhana) आणि दिप्ती शर्माचा (Deepti Sharma) समावेश करण्यात आला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ग्रेड बीमध्ये रेणुका ठाकुर, शेफाली वर्मा, ऋचा घोष, राजश्वेरी गायकवाड, जेमिमा रोड्रिग्स यांचा समावेश करण्यात आला आहे. ग्रेड सीमध्ये मेघना सिंह, देविका वैद्य, अंजलि सरवानी, पूजा वस्त्राकर, सभिनेनी मेघना, स्नेह राणा, राधा यादव, हरलीन देओल आणि यसिका भाटिया यांचा समावेश करण्यात आला आहे.


महिला खेळाडूंना किती मानधन?
ग्रेड ए मधल्या खेळाडूंना वार्षिक 50 लाख रुपयांचं मानधन मिळणार आहे. तर ग्रेड बीमधल्या खेळाडूंना वार्षिक 30 लाख रुपये दिले जातात. ग्रेड सीमध्य ज्या महिला खेळाडू आहेत त्यांना वर्षाला 10 लाख रुपये मिळतील. भारतीय पुरुष क्रिकेटपटूंच्या तुलनेत महिला क्रिकेटपटूंना मिळणार रक्कम खूपच कमी आहे. 


पुरुष खेळाडूंना किती मानधन?
पुरुष क्रिकेटपटूंच्या सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट लिस्टमध्ये चार ग्रेड करण्यात आले आहेत. यात पहिली कॅटेगरी आहे ग्रेड ए प्लस आहे. यात चार टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली, रवींद्र जडेजा आणि जसप्रीत बुमराह या खेळाडूंचा समावेश आहे. ग्रेड ए प्लसमधल्या खेळाडूंना वार्षिक 7 कोटी रुपये मिळतात. त्यानंतर ग्रेड ए कॅटेगरी आहे. यात हार्दिक पांड्या, आर अश्विन, मोहम्मद शमी, ऋषभ पंत, अक्षर पटेल या खेळाडूंचा समावेश असून त्यांना 5 कोटी रुपये मानधन मिळतं.


ग्रेड बीमध्ये चेतेश्वर पुजारा, केएल राहुल, श्रेय्यस अय्यर, मोहम्मद सिराज, सुर्यकुमार यादव, शुभमन गिल या खेळाडूंचा समावेश असून त्यांना वार्षिक तीन कोटींचं मानधन बीसीसीआयकडून दिलं जातं. तर शेवटची म्हणजे चौथी कॅटरी ग्रेड सी असून यातल्या खेळाडूंना वार्षिक 1 कोटी मिळतात यात संजू सॅमसन, अर्शदीप सिंह, ईशान किशन आणि केएस भरत या खेळाडूंचा समावेश आहे.