BCCI Annual Contract List : टीम इंडियाने इंग्लंडविरुद्धची  (India vs England Test) पाच कसोटी सामन्यांची मालिका 3-1 अशी जिंकली आहे. टीम इंडियाच्या (Team India) या दमदार कामगिरीनंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) मोठी घोषणा केली आहे. बीसीसीआयने खेळाडूंच्या सेंट्रल कॉन्ट्रेक्टची (Central Contract) यादी जाहीर केली आहे. यात बीसीसीआयने मोठे निर्णय घेतले आहेत. यात सर्वात मोठा निर्णय घेतलाय तो म्हणजे या यादीतून ईशान किशन (Ishan Kishan) आणि श्रेयस अय्यरला (Shreyas Iyer) सेंट्रल कॉन्ट्रेक्टमधून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. बीसीसीआयला नडणं या दोघांना चांगलंच महागात पडलंय. बीसीसीआयने सांगितल्यानंतरही हे दोघं रणजी ट्रॉफी खेळले नाहीत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

युवा खेळाडूचा कॉन्ट्रेक्टमध्ये समावेश
वैयक्तिक कारणामुळे या दोघांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून माघार घेतली होती. पण नेमकं कारण काय हे सांगितलं नव्हतं. आता याचा फटका दोघांना सहन करावा लागला आहे. या दोघांऐवजी कसोटी क्रिकेटमध्ये सातत्याने दमदार कामगिरी करणाऱ्या यशस्वी जयस्वालचा सेंट्रेल कॉन्ट्रेक्टमध्ये समावेश करण्यात आला आहे. 


सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट म्हणजे काय?
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये टीम इंडियाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या खेळाडूंशी दरवर्षी 12 महिन्यांचा करार केला जातो. या कराराअंतर्गत खेळाडूंना एक ठराविक रक्कम मिळते. हे खेळाडू वर्षभरात आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळले नाहीत तरी या खेळाडूंना ती रक्कम मिळते. बीसीसीआयने यासाठी 4 ग्रेड केले आहेत.  A+, A, B, आणि C. A+ ग्रेडमधल्या खेळाडूंना वर्षाला 7 कोटी रुपये मिळतात. A ग्रेडमधल्या खेळाडूंना वार्षिक 5 कोटी रुपये दिले जातात. B ग्रेडमधल्या खेळाडूंना 3 कोटी रुपये तर C ग्रेडमधील खेळाडूंना प्रत्येक वर्षी 1 कोटी रुपये बीसीसीआयकडून दिले जातात. 


A+ ग्रेड
A+ ग्रेडमध्ये महत्त्वांच्या खेळाडूंना स्थान दिलं जातं. जे खेळाडू भारतासाठी क्रिकेटच्या तीनही फॉर्मेटमध्ये खेळतात आणि सातत्याने संघाचं प्रतिनिधीत्व करतात त्यांचा समावेश असतो. या ग्रेडमध्ये रोहित शर्मा, विराट कोहली, जसप्रीत बुमराह आणि रवींद्र जडेजा या खेळाडूंची नावं आहेत. 


A ग्रेड
या ग्रेडममध्ये 6 खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. यात केएल राहुल, मोहम्मद सिराज आणि शुभमन गिल यांना प्रमोशन मिळालं आहे. या यादीत रविचंद्रन अश्विन, शुभमन गिल, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, केएल राहुल आणि हार्दिक पंड्याचा समावेश आहे. 


B ग्रेड
वार्षिक पाच कोटी रुपये असलेल्या B ग्रेडमध्ये पाच क्रिकेटर्स आहे. यात यशस्वी जयस्वालची एन्ट्री झाली  आहे. यशस्वी जयस्वालचा पहिल्यांचा बीसीसीआयच्या सेंट्रल कॉन्ट्रॅक्टमध्ये समावेश झाला आहे. तर ऋषभ पंत आणि अक्षर पटेलचं A ग्रेडमधून B ग्रेडमध्ये डिमोशन झालं आहे. या यादीत सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, अक्षर पटेल, कुलदीप यादव आणि यशस्वी जयस्वालचा समावेश आहे.


C ग्रेड
या ग्रेडमध्ये 15 खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. या ग्रेडमधून उमेश यादव ईशान किशन आणि श्रेयस अय्यरला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. तर रजत पाटीदार, रिंकू सिंह, तिलक वर्मा या नव्या खेळाडूंना संधी मिळालीय.  रिंकू सिंह, तिलक वर्मा, ऋतुराज गायकवाड, शार्दुल ठाकुर, शिवम दुबे, रवि बिश्नोई, जितेश शर्मा, वॉशिंगटन सुंदर, मुकेश कुमार, संजू सॅमसन, अर्शदीप सिंह, केएस भरत, प्रसिद्ध कृष्णा, आवेश खान आणि रजत पाटीदार.