Anshuman Gaekwad cancer treatment : भारताचे माजी फलंदाज आणि कोच अंशुमन गायकवाड (Anshuman Gaekwad) सध्या कर्करोगाशी झुंज देत आहेत. त्यांना रक्ताचा कॅन्सर (blood Cancer) झाला आहे. 71 वर्षीय अंशुमन गायकवाड यांच्यावर गेल्या एका वर्षापासून लंडनच्या किंग कॉलेज रुग्णालयात उपचार सुरु आहेत. अंशुमन गायकवाड यांना आर्थिक मदत मिळावी यासाठी क्रिकेटचे 83 च्या बॅचने मदतीचा हात पुढे केला होता. तर बीसीसीआयकडे (BCCI) देखील मदतीची मागणी केली होती. अशातच आता बीसीसीआयचे सचिव जय शहा (Jay Shah) यांनी मोठी घोषणा केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बीसीसीआय सचिव जय शहा यांनी कॅन्सरशी झुंज देत असलेल्या भारताचा दिग्गज क्रिकेटपटू अंशुमन गायकवाड यांना आर्थिक सहाय्य देण्यासाठी तातडीने 1 कोटी रुपये देण्याची सूचना केली आहे. शहा यांनी गायकवाड यांच्या कुटुंबीयांशीही बोलून परिस्थितीचा आढावा घेतला आणि मदत केल्याची माहिती बीसीसीआने दिली आहे. 


कपिल देव, मोहिंदर अमरनाथ, सुनील गावसकर, संदीप पाटील, दिलीप वेंगसरकर, मदनलाल, रवी शास्त्री आणि कीर्ती आझाद यांनी अंशुमन गायकवाड यांना उपचारासाठी निधी मिळावा यासाठी अनेक प्रयत्न केले. तर कपिल देव यांनी जाहीरपणे बीसीसीआयला आवाहन केलं होतं. त्यानंतर आता बीसीसीआयने मोठं मन दाखवल मदत जाहीर केली आहे. 



महान फलंदाज सुनील गावस्कर यांचा उजवा हात म्हणून ओळखले जाणारे अंशुमन गायकवाड यांनी पाकिस्तानला घाम फोडला होता. गायकवाड यांनी 1983-84 मध्ये जालंधर कसोटी सामन्यात पाकिस्तानविरुद्ध 201 धावा करण्यासाठी 671 मिनिटे फलंदाजी केली. पाकिस्तानसाठी अंशुमन गायकवाड यांची विकेट काढणं अशक्य झालं होतं. अंशुमन गायकवाड यांच्या या इनिंगची कीर्ती जगभरात गाजली होती.


दरम्यान, अंशुमन गायकवाड यांचा क्रिकेटचा वारसा उल्लेखनीय आहे. त्यांनी 1975 ते 1987 दरम्यान भारतासाठी 40 कसोटी आणि 15 एकदिवसीय सामने खेळले होते. नंतर दोन वेगवेगळ्या कार्यकाळात भारताचे मुख्य प्रशिक्षक म्हणून काम केलं आहे. अंशुमन गायकवाड हे 1997 ते 1999 दरम्यान भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक होते. अनेक सामन्यात अंशुमन गायकवाड यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे.