Virat Kohli-Gautam Gambhir Interview : टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर (Gautam Gambhir) आणि टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) यांच्या मुलाखतीचा एक व्हिडिओ बीसीसीआयने (BCCI) सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. या मुलाखतीत गौतम गंभीरने विराट कोहलीबाबत मोठा खुलासा केला आहे. विराटच्या चाहत्यांनाही कदाचित ही गोष्ट माहित नाही. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात विराट कोहली भगवान शंकराचा मंत्रोपच्चार करत होता असं गंभीरने म्हटलं आहे. बीसीसीआय टीव्हीच्या मुलाखतीत गौतम गंभीरने विराट कोहलीच्या 2014-15 तल्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याचा किस्सा सांगितला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

1093 वेळा भगवान शंकराचं नाव?


2014-15 मध्ये टीम इंडिया ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर होती. या दौऱ्यात विराट कोहली फलंदाजीला उतरल्यानंतर ऑस्ट्रेलियन गोलंदांजाने टाकलेल्या प्रत्येक चेंडूच्या आधी ॐ नमः शिवायचं उच्चारण करत होता. विराट कोहली या मालिकेत एकूण 1093 चेंडू खेळला. म्हणजे 1093 वेळा त्याने भगवान शंकराचं नाव घेतलं असा खुलासा गंभीरने केला आहे. या मालिते टीम इंडियाला पराभव पत्करावा लागला होता. पण विराट कोहलीसाठी मात्र ही मालिका खास ठरली होती.


विराटसाठी खास ठरली मालिका


ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या या मालिकेत महेंद्रसिंग धोनीने अचानक कर्णधारपद सोडलं आणि कर्णधारपदाची जबाबदारी विराट कोहलीच्या खांद्यावर सोपवण्यात आली. कर्णधार आणि फलंदाज अशी दुहेरी जबाबदारी निभावणाऱ्या विराटने या मालिकेत धावांचा पाऊस पाडला. विराटने या मालिकेत 86 च्या अॅव्हरेजने 692 धावा केल्या. यात तब्बल 4 शतकं आणि एका अर्धशतकाचा समावेश होता. या दौऱ्यात विराट कोहलीने ज्या पद्धतीने फलंदाजी केली तशी फलंदाजी आजपर्यंत एकाही फलंदाजाने केली नाही असं गंभीरने म्हटलंय.


विराट कोहलीचा त्यावेळचा जो फॉर्म होता, तसाच फॉर्म 2009 मध्ये नेपिअर कसोटी पाहायला मिळाला होता. या सामन्यात विराटने 436 चेंडूंचा सामना करत 137 धावा केल्या होत्या. लक्ष्मणने या सामन्यात 124 धावा केल्या होत्या. या सामन्यात विराट हनुमान चालीसाचा जाप करत होता असंही गंभीरने या मुलाखतीत म्हटलं आहे.



विराटच्या कर्णधारपदाचं कौतुक


गौतम गंभीरने बीसीसीआय टीव्हीवरच्या मुलाखतीत विराट कोहीलच्या कर्णधारपदाचं कौतुक केलं आहे. विराट कोहली यासाठी चांगला कर्णधार बनला कारण त्याने गोलंदाजीवर विशेष काम केलं. त्याने वेगवान गोलंदाजीची फौज तयार केली. यात जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, उमेश यादव, मोहम्मद सिराज यांची नावं आहेत. विराट कोहली भारताचा सर्वात यशस्वी कसोटी कर्णधार आहे. त्याच्या नेतृत्वात टीम इंडियाने 40 कसोटी सामने जिंकले.