Top 10 Richest Cricket Boards in the World : जगातील अनेक देशात क्रिकेट हा खेळ खेळला जातो. यात 108 देशांना आंतरराष्ट्रीय क्रिकेट काऊन्सिलद्वारे (ICC) मान्यता मिळाली आहे. ज्यात 12 पूर्ण आणि 96 सहाय्यक सदस्य आहे. याचा अर्थ देशात 108 क्रिकेट बोर्ड आहे. पण या सर्वात भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयचा (BCCI) दबदबा जास्त आहे. बीसीसीआयची एकट्याची कमाई 10 क्रिकिटे बोर्डांपेक्षा 85 टक्के जास्त आहे. टी20 वर्ल्ड कप विजयानंतर टीम इंडियाला तब्बल 125 कोटी रुपयांचं बक्षीस जाहीर केलं. यावरुन टी20 वर्ल्ड कप यावरुनच बीसीसीआयची श्रीमंतीचा अंदाज लावला जाऊ शकतो. श्रीमंत क्रिकेट बोर्डांच्या यादीत क्रिकेट ऑस्ट्रेलिया (CA) दुसऱ्या क्रमांकावर आहे.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बीसीसीआय श्रीमंत क्रिकेट बोर्ड
भारतात क्रिकेट म्हणजे धर्म मानला जातो. देशात क्रिकेटची प्रचंड लोकप्रियता आहे. कोणतीही स्पर्धा असली तरी स्टेडिअम हाऊसफूल असतात. यातूनच भारतीय क्रिकेट बोर्डाची बक्कळ कमाई होते. मीडिया रिपोर्टनुसार बीसीसीआयची एकूण संपत्ती  2.25 अरब डॉलर म्हणजे भारतीय रुपयात 18,700 करोड इतकं आहे. ही कमाई ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्डाच्या 28 टक्के जास्त आहे. 


बीसीसीआयच्या उत्पन्नाचं सर्वात मोठं स्त्रोत आहे ते इंडियन प्रीमिअर लीग. प्रत्येक हंगामात आयपीएलची लोकप्रियता वाढत चालली आहे. यातून बीसीसीआयला करडो रुपयांची कमाई होते. आता बीसीसीआयने महिला आयपीएलला सुद्धा सुरु केली आहे. त्यामुळे बीसीसीआयच्या उत्पानात आणखी वाढ झाली आहे. 


क्रिकेट ऑस्ट्रेलियात दुसऱ्या क्रमांकावर
कमाईच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर क्रिकेट ऑस्ट्रेलियाचा नंबर लागतो. मीडिया रिपोर्टनुसार ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्डाचं उत्पन्न जपळपास 79 मिलिअन डॉलर म्हणजे 660 कोटी रुपये इतकं आहे. ऑस्ट्रेलियातही बिग बॅश लीग प्रसिद्ध आहे. इंग्लंड क्रिकेट बोर्ड या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे तर पाकिस्तान क्रिकेट बोर्ड चौथ्या क्रमांकावर आहे. 


जगातील 10 श्रीमंत क्रिकेट बोर्ड


भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड (BCCI): अंदाजे 2.25 अरब डॉलर म्हणजे 18,700 कोटी रुपये
क्रिकेट आस्ट्रेलिया (CA): अंदाजे 79 मिलियन डॉलर म्हणजे 660 कोटी रुपये
इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्ड (ECB): अंदाजे 59 मिलियन डॉलर म्हणजे 492 कोटी रुपये
पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (PCB): अंदाजे 55 मिलियन डॉलर म्हणजे 459 कोटी रुपये
बांगलादेश क्रिकेट बोर्ड (BCB): अंदाजे 51 मिलियन डॉलर म्हणजे 426 कोटी रुपये
क्रिकेट साउथ अफ्रीका (CSA): अंदाजे 47 मिलियन डॉलर म्हणजे 392 कोटी रुपये
झिम्बाब्वे क्रिकेट बोर्ड (ZCB): अंदाजे 38 मिलियन डॉलर म्हणजे 317 कोटी रुपये
श्रीलंका क्रिकेट बोर्ड (SLC): अंदाजे 20 मिलियन डॉलर म्हणजे 167 कोटी रुपये
वेस्टइंडीज क्रिकेट बोर्ड (WICB): अंदाजे 15 मिलियन डॉलर म्हणजे 125 कोटी रुपये
न्यूझीलंड क्रिकेट बोर्ड (NZC): अंदाजे 9 मिलियन डॉलर म्हणजे 75 कोटी रुपये