सिडनी : Former Australian Cricketer Ian Chappell Retire From Commentary: माजी ऑस्ट्रेलियन कर्णधार आणि प्रसिद्ध समालोचक इयान चॅपेल यांनी जवळपास 45 वर्षानंतर आता क्रिकेट समालोचनाला अलविदा करण्याचा निर्णय घेतला आहे. 78 वर्षीय इयान चॅपेल यांच्या या निर्णयामुळे चाहत्यांमध्ये नाराजी दिसून आली आहे. रिची बेनो, बिल लॉरी आणि टोनी ग्रेग यांच्यासमवेत चॅपल यांनी समालोचनाची प्रसिद्ध टीम तयार केली. (Australian cricket legend Ian Chappell has decided to end his 45-year-long stunning commentary career) 


चॅपल यांनी मोठे विधान  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इयान चॅपेल यांना 2019 मध्ये त्वचेचा कर्करोग झाल्याचे निदान झाले आणि या आजारातून बरे होण्यासाठी त्यांना पाच महिने लागले. सिडनी मॉर्निंग हेराल्डच्या वृत्तानुसार, चॅपल म्हणाले, 'जेव्हा समालोचनाचा प्रश्न येतो तेव्हा मी त्याबद्दल विचार करत होतो.' ते म्हणाले, 'मी काही वर्षांपूर्वी आजारी पडलो होतो, पण त्यातून बरा होऊ शकलो हे माझे भाग्य आहे. पण आता गोष्टी कठीण होत चालल्या आहेत आणि मला वाटले की प्रवास करणे आणि पायऱ्या चढणे यासारख्या गोष्टी आता माझ्यासाठी कठीण होत आहेत.


चॅपल यांनी मौन सोडले  



इयान चॅपेल म्हणाले, 'मग मी रॅबिट्स (रग्बी लीग समालोचक रे वॉरेन) निवृत्तीबद्दल काय म्हणायचे, ते वाचले आणि मला ते जे म्हणाले ते मला आवडले. ते म्हणाले की, तुम्ही चूक करण्यापासून फक्त एका वाक्याच्या अंतरावर आहात. इयान चॅपल यांने ऑस्ट्रेलिया संघासाठी अनेक सामने स्वबळावर जिंकले. 


ऑस्ट्रेलियाने अनेक सामने जिंकले 


इयान चॅपेल आता 78 वर्षांचे झाले आहेत. त्यांनी 1964 ते 1980 दरम्यान टॉप ऑर्डर बॅट्समन म्हणून कसोटी क्रिकेटमध्ये 5345 धावा केल्या. त्यानी 30 कसोटी सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियाचे नेतृत्वही केले. तसेच त्यांनी 30 एकदिवसीय सामनेही खेळले आणि क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर ते समालोचक बनले.