भारत-इंग्लंड पहिल्या कसोटीसाठी प्लेईंग-11 जाहीर, मॅच विनर खेळाडू बाहेर
India vs England 1st Test : भारत आणि इंग्लंडदरम्यान पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. यातला पहिला कसोटी सामना गुरुवारपासून म्हणजे 25 जानेवारीपासून खेळवला जाणार आहे. पहिल्या कसोटी सामन्यासाठी प्लेईंग इलेव्हनची घोषणा करण्यात आली आहे.
India vs England 1st Test : भारत आणि इंग्लंडदरम्यानच्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत पहिला सामना 25 जानेवारीपासून खेळवला जाणार आहे. हैदराबादमधल्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडिअमवर हा सामना रंगेल. भारतीय वेळेनुसार सकाळी 9.30 वाजता सामन्याला सुरुवात होईल. या सामन्याच्या आधी भारतीय क्रिकेट संघाला (Team India) मोठा धक्का बसला. स्टार फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) कसोटी मालिकेत खेळणार नाहीए. त्याच्या जागी युवा रजत पाटीदारचा (Rajat Patidar) समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे इंग्लंडविरुद्धच्या पहिलाय कसोटी सामन्यात कोणाला संधी मिळणार याकडे भारतीय क्रिकेट चाहत्यांचं लक्ष लागलं आहे.
एकीकडे भारतीय संघाच्या प्लेईंगि इलेव्हनबाबत अद्याप काही ठरत नसताना इंग्लंड क्रिकेट संघाने (England Cricket Team) पहिल्या सामन्यासाठी प्लेईंग इलेव्हनची घोषणा केली आहे. इंग्लंडचा मॅचविनर वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनला प्लेईंग इलेव्हनमधून बाहेर ठेवण्या आलं आहे. संघात तीन फिरकी गोलंदाजांना संधी देण्यात आली आहे.
तीन फिरकी गोलंदाजांचा समावेश
इंग्लंड क्रिकेट बोर्डाने निवदेन जारी करत संघाची घोषणा केली आहे. संघात एक वेगवान आणि तीन फिरकी गोलंदाजांचा समावेश करण्यात आला आहे. फिरकी गोलंदाज टॉम हार्टले कसोटी पदार्पण करणार आहे. तर ओली पोप, बेन फॉक्स, रेहान अहमद आणि जॅक लीच यांचं संघात पुनरागमन झालं आहे. टॉम हार्टलेने 20 प्रथम श्रेणी क्रिकेट सामन्यात 40 विकेट घेतल्या आहेत. हार्टलेबरोबर जॅक लीच आणि रेहान अहमद फिरकी गोलंदाजीची धुरा सांभाळलतील.
जेम्स अँडरसन बाहेर
इंग्लंडचा हुकमी वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनला पहिल्या कसोटी सामन्यात संधी देण्यात आलेली नाही. अँडरसन हा भारताविरुद्ध सर्वात यशस्वी गोलंदाज आहे. भारताविरुद्ध अँडरसनने 35 कसोटी सामन्यात 139 विकेट घेतल्या आहेत. अँडरसनचा हा सहावा भारतीय दौरा आहे. अँडरसनव्यतिरिक्त इंग्लंडचा एकही गोलंदाज भारताविरुद्ध 100 किंवा त्यापेक्षा जास्त विकेट घेऊ शकलेला नाही.
पहिल्या कसोटी सामन्यासाठी इंग्लंडी प्लेईंग इलेव्हन
जॅक क्रॉली, बेन डकेट, ओली पोप, जो रूट, जॉनी बेयरस्टो, बेन स्टोक्स (कर्णधार), बेन फॉक्स (विकेटकीपर), रेहान अहमद, मार्क वुड, टॉम हार्टले, जॅक लीच
भारत Vs इंग्लंड कसोटी वेळापत्रक
पहिला कसोटी सामना : 25-29 जानेवरी, हैदराबाद
दुसरा कसोटी सामना : 2-6 फेब्रुवारी, विशाखापट्टनम
तिसरा कसोटी सामना : 15-19 फेब्रुवारी, राजकोट
चौथा कसोटी सामना : 23-27 फेब्रुवारी, रांची
पाचवा कसोटी सामना : 7-11 मार्च, धर्मशाला