रवी शास्त्रीची तुलना मनमोहन सिंग यांच्याशी
भारतीय क्रिकेट टीमच्या प्रशिक्षकपदासाठी रवी शास्त्रीनं अर्ज केल्यानंतर त्याच्यावर सोशल नेटवर्किंगवरून टीका करण्यात येत आहे.
मुंबई : भारतीय क्रिकेट टीमच्या प्रशिक्षकपदासाठी रवी शास्त्रीनं अर्ज केल्यानंतर त्याच्यावर सोशल नेटवर्किंगवरून टीका करण्यात येत आहे. ट्विटरवर काही जणांनी रवी शास्त्रीची तुलना मनमोहन सिंग यांच्याशी केली आहे. ओह प्लीज, पुन्हा नको. आम्हाला भारतीय क्रिकेट टीममध्ये मनमोहन सिंह नकोत. आमच्याकडे राजकारणात आधीच एक आहेत, असं ट्विट काजोल नावाच्या ट्विटर हॅण्डलवरून करण्यात आलं आहे.
विराट कोहलीला रवी शास्त्रीला पहिल्या दिवसापासून प्रशिक्षक बनवायचं होतं. कोहली सोनिया गांधी आहे तर रवी शास्त्री मनमोहन सिंग. रवी शास्त्री मनमोहन सिंग यांच्याइतकेच बेकार आहेत, असं ट्विट DR SHERLOCKED या ट्विटर हॅण्डलवरून करण्यात आलं आहे.
रवींद्र जडेजाच्या पॅरोडी अकाऊंटवरूनही रवी शास्त्रींवर निशाणा साधण्यात आला आहे. रवी शास्त्रींनी प्रशिक्षक होण्यासाठी अर्ज केला आहे. भारतीय टीम त्यांच्या मनमोहन सिंग यांच्यासाठी तयार आहे, असं ट्विट सर रवींद्र जडेजा या पॅरोडी अकाऊंटवरून करण्यात आलं आहे.