T20 वर्ल्ड कपच्या तिकिटांची विक्री सुरु, भारत-पाकिस्तान सामन्यासाठी खिसा रिकामा करावा लागणार
IND vs PAK: क्रिकेटप्रेमींना आता उत्सुकता आहे ती या वर्षात होणाऱ्या टी20 विश्वचषकाची. यासाठी सर्व संध तयारीला लागले आहेत. यादरम्यान टी20 विश्वचषकात सामन्यांच्या तिकिटाची आयसीसीने घोषणा केली आहे.
T20 World Cup 2024 Ticket Released : क्रिकेट चाहत्यांसाठी 2024 हे वर्ष मेजवानीचं ठरणार आहे. या वर्षात टी20 विश्वचषक खेळवला जाणार आहे. 1 जूनपासून 29 आयसीसी टी20 विश्वचषकाला सुरुवात होतेय. तर 29 जूनला अंतिम सामना खेळवला जाणार आहे. या स्पर्धेत तब्बल 20 संघांचा समावेश करण्यात आला असून अमेरिका (America) आणि वेस्टइंडिज (West Indies) या स्पर्धेचे यजमान देश असणार आहेत. स्पर्धेच्या वेळापत्रकाची (T20 World Cup Timetable) घोषणा झाली असतानाच आता आयसीसीने टी20 विश्वचषकाच्या तिकाटांची विक्रीही (T20I World Cup Ticket Released) सुरु केली आहे. ग्रुप स्टेज, सुपर-8 आणि सेमीफायनरपर्यंतच्या सामन्यासाठी एकूण 2 लाख 60 हजार तिकिटं जारी करण्यात आलीत.
तिकिटांचे दर किती?
वेगवेगळ्या कॅटेगरीनुसार तिकिटांचे दर निश्चित करण्यात आले आहेत. आयसीसीने जारी केलेल्या तिकाटांमध्ये सर्वा कमी तिकट 6 डॉलरचं म्हणजे भारतीय चलनात 500 रुपयांचे आहे. तर सर्वात महागडं तिकिट हे 25 डॉलर म्हणजे 2071 रुपयांचं आहे. t20worldcup.com या वेबसाईटवर जाऊन तुम्ही टी20 विश्वचषकाची तिकिटं बूक करु शकता. आयसीसीच्या नियमानुसार एक व्यक्ती एका ओळखपत्रावर जास्तीजास्त सहा तिकिटं विकत घेऊन शकतो. अशा पद्धतीने कोणीही वेगवेगळ्या सामन्यांची तिकिटं बूक करु शकतो.
भारत-पाकिस्तानची सर्वात महाग तिकिटं
भारत आणि पाकिस्तान सामना पाहायचा असेल तर क्रिकेट चाहत्यांना आपला खिसा थोडा सैल करावा लागणार आहे. या सामन्याची प्रीमिअम तिकिटांची किंमत 175 डॉलर ठेवण्यात आलीय. भारतीय रुपयात 14450 रुपये मोजावे लागणार आहे. तर स्टॅंडर्ड प्लस तिकिटांची किंमत 25000 रुपये इतकी ठेवण्यात आलीय. भारत-पाकिस्तान सामन्याचं सर्वात महागडं तिकिट 33000 रुपयांचं आहे. स्टॅंडर्ड कॅटगिरीचं हे तिकिट आहे.
भारत-पाकिस्तान एकाच ग्रुपमध्ये
आयसीसी टी20 विश्वचषकात एकूण 20 संघांचा समावेश असून पाच संघांचा एक ग्रुप बनवण्यात आला आहे. भारताचा ए ग्रुपमध्ये समावेश करण्यात आला असून भारताशिवाय पाकिस्तान, अमेरिका, कॅनडा आणि आयर्लंड या संघांचा समावेश आहे. भारताच्या मिशन टी20 विश्वचषकाची सुरुवात 5 जूनपासून आयर्लंडविरुद्धच्या सामन्याने होणार आहे. पण क्रिकेट चाहत्यांना प्रतिक्षा आहे ती भारत-पाकिस्तान सामन्याची. हा सामना 9 जूनला खेळवला जाणार आहे. भारत-पाकिस्तान हायव्होल्टाज सामना न्यूयॉर्कला रंगणार आहे.
चार ग्रुपमधील टॉपचे दोन संध सुपर-8 मध्ये प्रवेश करतील. सुपर-8 मध्ये चार संघांचा एक ग्रुप असेल. या ग्रुपमधील टॉपचे दोन संघ सेमीफायनलमध्ये एन्ट्री मारतील. सेमीफायनलचा पहिला सामना 26 जूनला त्रिनिदाद आणि टोबॅगोमध्ये तर सेमीफायनलचा दुसरा सामना 27 जूनला गयानात खेळवला जाणार आहे.