भारत-बांगलादेश पहिली कसोटी, कशी असेल प्लेईंग XI... कुठे आणि कधी पहाल सामना?
IND vs BAN 1st Test : भारत आणि बांगलादेशदरम्यान दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला कसोटी सामना गुरुवारपासून म्हणजे 19 सप्टेंबरपासून सुरु होणार आहे. पहिल्या कसोटी सामन्यासाठी चेन्नईची खेळपट्टी कशी आहे, प्लेईंग इलेव्हन कशी असणार आहे पाहूयात.
India vs Bangladesh 1st Test : भारत आणि बांगलादेशदरम्यान गुरुवार म्हणजे 19 सप्टेंबरपासून चेन्नईच्या एमम चिदम्बरम स्टेडिअमवर (MA Chidambaram Stadium) पहिला कसोटी सामना खेळवला जाणार आहे. चेन्नईच्या के एमए चिदम्बरम स्टेडिअमवर एकूण 9 खेळपट्ट्या आहेत. यातल्या तीन खेळपट्ट्या लाल मातीने बनवण्यात आल्या आहेत. भारत आणि बांगलादेशदरम्यानचा (Ind vs Ban 1st Test) कसोटी सामना लाल मातीच्या खेळपट्टीवरच खेळवला जाणार आहे. चेन्नईची खेळपट्टी फिरकी गोलंदांजांना साथ देणारी आहे. पण लाल मातीची खेळपट्टी असल्याने सामन्याच्या सुरुवातीला वेगवान गोलंदाजांसाठीही फायदेशीर ठरणार आहे.
त्यामुळे दोन्ही संघांसाठी टॉस महत्त्वाचा ठरणार आहे. पहिल्या सामन्यात पावसाचा व्यत्यय मोठ्या ब्रेकनंतर टीम इंडिया (Team India) मैदानावर उतरणार आहे. त्यामुळे क्रिकेट चाहतेही या सामन्यासाठी उत्सुक आहेत. पण चाहत्यांच्या या उत्सुकतेवर पाणी फिरू शकतं. भारत-बांगलादेश पहिल्या कसोटीवर पावसाचं सावट आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार गुरुवारी 40 टक्के पावसाची शक्यता आहे. तर सामन्याच्या तिसऱ्या दिवशीही पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
कुठे पहाल सामना?
भारत-बांगलादेश सामन्याची तिकिटं हाऊसफुल झाली आहेत. पण तिकिट मिळालं नसलं तरी नाराज होण्याची गरज नाही. टीव्ही किंवा मोबाईलवर लाईव्ह सामन्याची मजा घेता येणार आहे. हा सामना वायकॉम 18 नेटवर्कवर लाईव्ह पहाता येणार आहे. तर मोबाईलवर जिओ सिनेमावर या सामन्याचं लाईव्ह स्ट्रिमिंग केलं जाणार आहे. पहिल्या सामन्यासाठी
भारताची संभाव्य प्लेईंग इलेव्हन : रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जायसवाल, शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, ऋषभ पंत (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज आणि जसप्रीत बुमराह. पहिल्या सामन्यासाठी
बांगलादेशची संभाव्य प्लेईंग इलेव्हन : शादमान इस्लाम, जाकिर हसन, नजमुल हुसैन शांतो, मोमिनुल हक, शाकिब अल हसन, मुशफिकुर रहीम, लिटन दास, मेहंदी हसन मेराज, तैजुल इस्लाम, नाहिद राणा आणि हसन महमूद/तस्कीन अहमद.