भारत-बांगलादेश टी20 मालिकेदरम्यान मोठी बातमी, स्टार ऑलराऊंडरने जाहीर केली टी20तून निवृत्ती... शेवटची मालिका
Ind vs Bangladesh T20 Series : भारत आणि बांगलादेशदरम्यान तीन टी20 सामन्यांची मालिका खेळवली जात आहे. यातला पहिला सामना जिंकत टीम इंडियाने आघाडी घेतलीय. तर दुसरा टी20 सामना 9 ऑक्टोबरला खेळवला जाणार आहे. यादरम्यान एका स्टार ऑलराऊंडरने निवृत्ती जाहीर केली आहे.
India vs Bangladesh T20 Series: भारत आणि बांगलादेशदरम्यान तीन टी20 सामन्यांची मालिका खेळवली जात आहे. यातला पहिला सामना जिंकत टीम इंडियाने (Team India) आघाडी घेतलीय. मालिकेतला दुसरा सामना 9 ऑक्टोबरला खेळवला जाणार असून दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडिअमवर रंगणार आहे. दुसरा सामना जिंकत मालिकेत आघाडी घेण्यासाठी सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली खेळणारी टीम इंडिया सज्ज झाली आहे. यादरम्यान मोठी घडामोड समोर आली आहे. या मालिकेत खेळणाऱ्या दिग्गज ऑलराऊंडरने टी20 अचानक निवृत्ती जाहीर केली आहे.
दिग्गज ऑलराऊंडरने जाहीर केली निवृत्ती
बांगलादेशचा दिग्गज ऑलराऊंडर महमुदुल्लाहने (Mahmudullah) टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. भारत-बांगलादेश टी20 मालिका ही महमुदुल्लाहची अखेरची टी20 मालिका आहे. 38 वर्षांच्या महमुदुल्लाहने 2007 मध्ये केनियाविरोधात टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. सर्वाधिक टी20 कारकिर्द असणारा महमुदुदल्लाहला हा तिसरा खेळाडू आहे. याआधी बांगलादेशचाच शाकिब अल हसन 17 वर्ष आणि 209 दिवस टी20 क्रिकेट खेळलाय. तर झिम्बाब्वेचा सीन विलियम्स 17 वर्ष 166 दिवस टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळला होता.
महमुदुल्लाहने 2021 मध्ये कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. आता त्याने टी20 क्रिकेटलाही अलविदा केला आहे. पण एकदिवसीय क्रिकेटमध्ये मात्र तो खेळत राहाणार आहे. भारतात 2023 मध्ये झालेल्या एकदिवसीय वर्ल्ड कप स्पर्धेत महमुदुल्लाहने 328 धावा केल्या होत्या. बांगलादेशसाठी सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला होता.
एकदिवसीय क्रिकेटवर लक्ष केंद्रीत
बांगलादेश क्रिकेटसाठी ही दुसरी मोठी बातमी आहे. याआधी बांगलादेशचा स्टार खेळाडू शाकिब हससने निवृत्ती जाहीर केली होती. भारत-बांगलादेश कसोटी मालिकेरम्यान शाकिबने टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होत असल्याची घोषणा केली होती. आता काही दिवसांच्या अंतरानेच महमुदुदल्लाहनेही टी20 क्रिकेटला अलविदा केला आहे. भारत दौऱ्यावर असतानाच निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला होता, असं महमुदुदल्लाहने म्हटलं आहे. एकदिवसीय वर्ल्ड कपमधल्या दमदार कामगिरीनंतर एकदिवसीय क्रिकेटवरच लक्ष केंद्रीत करण्याचं ठरवलं असंही महमुदुदल्लाहने सांगितलं.
डिसेंबरमध्ये वेस्ट इंडिजमध्ये होणारी तीन सामन्याची एकदिवसीय मालिका आणि 2025 मध्ये होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी तयारी करणार असल्याचंही महमुदुदल्लाहने म्हटलं आहे.