India vs Ireland T20 : भारत आणि आयर्लंडदरम्यानच्या तीन टी20 सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना आज खेळवला जाणार आहे. भारतीय वेळेनुसार संध्याकाळी साडेसात वाजता डबलिनच्या (Dublin) मालाहाइड क्रिकेट क्बलच्या स्टेडिअममध्ये खेळवला जाणार आहे. आयर्लंड दौऱ्यात टीम इंडियाचं (Team India) नेतृत्व प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुहराहकडे (Jasprit Bumrah) सोपवण्यात आलं आहे. बुमराहच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या संघात युवा खेळाडूंचा समावेश करण्यात आलं आहे. एशिया कप आणि वर्ल्ड कपच्या तोंडावर युवा खेळाडूंच्या कामगिरीवर लक्ष असणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बुमराहचं पुनरागमन रखडणार?
जसप्रीत बुमराह तब्बल एक वर्षांनंतर भारतीय क्रिकेट संघात पुनरागमन करणार आहे. पाठिच्या दुखापतीमुळे तो टीम इंडियापासून दूर होता. आता तो दुखापतीतून सावरला असून टी20 सामन्यांमधून पुनरागमन करणार आहे. बुहराहचा यॉर्कर पाहण्यासाठी क्रिकेटप्रेमीही उत्सुक आहेत. आयर्लंडमध्ये सामन्यापूर्वीच्या सरावात बुमराहाचा भेदक मारा पाहिला मिळाला होता. हा व्हिडिओ सोशल मीडियावरही चांगलाच व्हायरल झाला होता. पहिल्या टी20 सामन्यापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेतही पुनरगामन करण्यासाठी उत्सुक असल्याचं म्हटलं होतं. 


बुमराहच्या पुनरागमनाकडे क्रिकेट प्रेमींचं लक्ष लागलेलं असतानाच क्रिकेटप्रेमींसाठी डबलिंगमधून एक वाईट बातमी समोर आली आहे. भारत-आयर्लंड सामन्यात पावसाचं सावट आहे. सामन्याला काही तास उरले असताना आयरिश हवामान विभागाने ट्विट करत डबलिनमध्ये पावसाची शक्यता वर्तवली आहे. 


डबलिनमध्ये यलो अलर्ट
आयर्लंडमधल्या हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे. यात डबलिनमध्ये मुसळधार पावसाची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. खराब हवामानामुळे काही भागातील वीज पुरवठाही खंडीत होऊ शकतो असा अंदाजही हवामान विभागाने वर्तवला आहे. गुरुवारी रात्री या भागात पावसाची रिपरिप सुरु होती. 


बुमराहच्या कामगिरीवर लक्ष
आयर्लंड दौऱ्यात युवा खेळाडूंबरोबरच क्रिकेटप्रेमींचं लक्ष असेल तर यॉर्कर किंग जसप्रीत बुमराहच्या कामगिरीवर. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत बुमराच्या पाठिला दुखापत झाली होती. यावर शस्त्रक्रियाही करण्यात आली. तीन टी20 सामन्यात बुमराहला तब्बल 12 षटकं टाकायची आहे. यावरुन बुमराहच्या फिटनेसची चाचणी होणार आहे. पाकिस्तानात होणाऱ्या एशिया कप आणि भारतात वर्षअखेरीस होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकाच्यादृष्टीने बुहमराहची कामगिरी महत्त्ताची ठरणार आहे. 


भारतीय टीम : जसप्रीत बुमराह (कर्णधार), ऋतुराज गायकवाड़ (उपकर्णधार), यशस्वी जायसवाल, तिलक वर्मा,  रिंकू सिंह, संजू सॅमसन (विकेटकीपर), जितेश शर्मा (विकेटकीपर), शिवम दुबे, वॉशिंगटन सुंदर, शाहबाज अहमद, रवि बिश्नोई, प्रसिद्ध कृष्णा, अर्शदीप सिंह, मुकेश कुमार, आवेश खान


आयर्लंड टीम : पॉल स्टर्लिंग (कर्णधार), अँड्रयू बालबर्नी,  मार्क अडायर, रॉस अडायर, कर्टिस कॅम्फर, गॅरेथ डेलानी, जॉर्ज डॉकरेल, फिओन हँड, जोशुआ लिटिल, बैरी मैकार्थी, हॅरी टेक्टर, लोर्कन टकर, थियो वैन वोर्कोम, बेन व्हाइट, क्रेग यंग.