आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पहिलं अर्धशतक, मैदानावरच तिलक वर्माचा अतरंगी डान्स... सोशल मीडियावर Video व्हायरल
Tilak Varma : वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या टी20 सामन्यात भारताचा युवा फलंदाज तिलक वर्माने शानदार अर्धशतक झळकावलं. आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीतलं हे त्याचं पहिलं अर्धशतक ठरलंय. या शतकानंतर तिलक वर्माने अतरंगी डान्स केला. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Ind vs WI 2nd T20 : वेस्टइंडिजविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी20 मालिकेत भारतीय क्रिकेट संघाला (Team India) सलग दुसऱ्या पराभवाला सामोरं जावं लागलं. दुसऱ्या सामन्यात विंडीजने टीम इंडियाचा (West Indies) दोन विकेट राखून पराभव केला. टीम इंडियाचे जवळपास सर्व फलंदाज या सामन्यात फ्लॉप ठरले. याला अपवाद होता तो फक्त युवा डावखुरा फलंदाज तिलक वर्मा (Tilak Varma). आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पणात 39 धावांची खेळी करणाऱ्या तिलक वर्माने दुसऱ्या सामन्यात शानदार अर्धशतक ठोकलं. आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीतलं हे त्याचं पहिलंच अर्धशतक ठरलं. अर्धशतक केल्यानंतर तिलक वर्माने खास स्टाईलने सेलेब्रेशन केलं.
तिलक वर्माने दुसऱ्या टी20 सामन्यात अवघ्या 41 चेंडुत 5 चौकर आणि 1 षटकार मारत 51 धावांची खेळी केली. अर्धशतक पूर्ण केल्यानंर तिलक वर्मान पॅव्हेलिअनकडे इशारा करत डान्स केला. सामना संपल्यानंतर त्याला या डान्सबाबत विचारण्यात आलं. यावर त्याने दिलेलं उत्तर खूपच मजेशीर होतं. तिलक वर्माने आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीतलं पहिलं अर्धशतक आई-वडिल किंवा प्रशिक्षकाला नाही तर टीम इंडियाचा कर्णधार हिटमॅन रोहित शर्माला समर्पित केलं. याबाबत तिलक वर्माने खुलासा केला आहे.
तिलक वर्माने आपल्या शानदार खेळीने चाहत्यांची मन जिंकली. अर्धशतकानंतर तिलक वर्माने मैदानावरच डान्स केला. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. याबाबत तिलक वर्माने सांगितलं, हे सेलिब्रेशन रोहितभाईची (Rohit Sharma) मुलगी सॅमी अर्थात समायरासाठी (Samaira) होतं. समाराया आणि माझं नातं खूपच खास आहे. त्यामुळे शतक किंवा अर्धशतक लगावल्यावर तिच्यासाठी सेलिब्रेशन करणार हे आधीच ठरवलं होतं. सॅमी आणि मी एकमेकांबरोबर खूप खेळतो, खूप मस्ती करतो असा खुसाला तिलक वर्माने केला आहे. आयपीएल सामन्यादरम्यान तिलक वर्मा रोहित शर्माची मुलगी समायराबरोबर अनेकदा मस्ती करताना दिसला होता.
टीम इंडियाचे फलंदाज फ्लॉप
दुसऱ्या टी20 सामन्यात तिलक वर्मा वगळता भारताच्या एकाही फलंदाजीला मोठी धावसंख्या उभारता आलेली नाही. तिलक वर्माने 51 धावा केल्या. तर इतर फलंदाजांना 30 धावाही पार करता आल्या नाहीत. भारताच्या ईशान किशनने 27 तर हार्दिक पांड्याने 24 धावा केल्या. भारता क्रिकेट संघाने 7 विकेट गमावत 152 धावा केल्या. शुभमन गिल, सूर्यकुमार यादव आणि संजू सॅमसन तर धावांचा दुहेरी आकडाही गाठू शकले नाहीत. . भारताने विजयासाठी दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजची सुरुवातही खराब झाली होती. पहिल्याच षटकात हार्दिक पांड्याने दोन विकेट घेत विंडिजला मजबूत धक्का दिला.
एकाबाजूला एकामागोमाग विकेट जात असताना दुसऱ्या बाजूला निकोलस पूरनने एकहाती किल्ला लढवला. त्याने 6 चौकार आणि 4 षटकार लगावत 64 धावा करत विंडिजला विजयाच्या जवळ आणून ठेवलं. त्यानंतर तळाच्या अकिल होसेन आणि अल्झारी जोसेफने विजयावर शिक्कामोर्तब केलं. भारताचा हा सलग दुसरा पराभव ठरला आहे.