IND vs WI 4th T20 : भारत आणि वेस्टइंडिजदरम्यान आज चौथा टी20 सामना खेळवला जाणार आहे. हा सामना अमेरिकेच्या फ्लोरिडामध्ये (US Florida) रंगणार आहे. पाच टी20 सामन्यांच्या मालिकेत टीम इंडिया (Team India) 1-2 ने पिछाडीवर आहे. त्यामुळे आजचा सामना जिंकत मालिकेत 2-2 अशी बरोबरी करण्याचा भारतीय क्रिकेट संघाचा प्रयत्न असेल. पहिल्या दोन सामन्यात झालेल्या पराभवामुळे मालिका गमावण्याचं संकट टीम इंडियावर होतं. पण तिसरा सामना जिंकत टीम इंडियाने कमबॅक केलं. सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्माच्या दमदार खेळीच्या जोरावर हा सामना टीम इंडियाने सहज जिंकला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ईशान की यशस्वी?
पहिल्या दोन सामन्यात झालेल्या पराभवामुळे टीम इंडियाचा कर्णधार हार्दिक पांड्याने(Hardik Pandya) तिसऱ्या सामन्यासाठी संघात काही बदल केले. सलामीला ईशान किशनऐवजी (Ishan Kishan) यशस्वी जयस्वालला (Yashasvi Jaiswal) संधी दिली. ईशान किशनने आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यात पदार्पण केलं. आयपीएलमध्ये दमदार कामगिरी करणाऱ्या यशस्वीकडून भारतीय संघाला मोठ्या अपेक्षा होत्या. पण पहिल्याच आंतरराष्ट्रीय सामन्यात त्याला मोठी कामगिरी करतात आली नाही. दुसऱ्याच चेंडुवर तो खराब फटक्यावर बाद झाला. त्यामुळे चौथ्या टी20 सामन्यात यशस्वीला पुन्हा संधी मिळणार की ईशान किशनचं कमबॅक होणार याची क्रिकेट चाहत्यांना उत्सुकता आहे. 


पहिल्या दोन टी20 सामन्यात ईशान किशनला समाधानकारक कामगिरी करता आलेली नाही. पण त्याआधी झालेल्या एकदिवसीय मालिकेत ईशानने चांगलीकामगिरी केली होती. त्यामुळे ईशानला पुन्हा संधी मिळेल अशी शक्यता वर्तवली जात आहे. यशस्वीकडे आंतरराष्ट्रीय सामन्यांचा अनुभव कमी असला तरी त्या आयपीएलमध्ये केलेली फलंदाजी आजही क्रिकेच चाहत्यांच्या स्मरणात आहेत. याच कामगिरीच्या जोरावर यशस्वीला टीम इंडियाच्या कसोटी संघातही स्थान मिळालं आणि पहिल्याच कसोटी सामन्यात त्याने शानदार शतक झळकावलं. फ्लोरिडाची खेळपट्टी फलंदाजांना साथ देणारी आहे, त्यामुळे कर्णधार हार्दिक यशस्वीला संघी देणार का हे बघावं लागेल.


शुभमन गिलचा खराब फॉर्म
दुसरीकडे टीम इंडियासमोर आणखी एक डोकेदुखी आहे ती म्हणजे शुभमन गिलच्या खराब फॉर्मची. पण यानंतरही शुभमन गिलंच डावाची सुरुवात करेल. तर तिसऱ्या क्रमांकावर सूर्यकुमार यादवची जागाही निश्चित आहे. चौथ्या क्रमांकावर तिलक वर्मा तर पाचव्या क्रमांकावर हार्दिक पांड्या अशी तगडी क्रमवारी असणार आहे. तिलक वर्माची ही पहिलीच आंतरराष्ट्रीय मालिका आहे, पण या तिनही सामन्यात तो सातत्यपूर्ण धावा करतोय. या मालिकेत सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तो पहिल्या क्रमांकावर आहे. 


गोलंदाजीत कुलदीप यादव, युजवेंद्र चहल आणि अक्षर पटेल या तीन फिरकी गोलंदाजांना संधी मिळण्याची शक्यता आङे. तर हार्दिक आणि मुकेश कुमारवर वेगवान गोलंदाजीची मदार असेल.