मुंबई : भारताने आयसीसी क्रिकेट वर्ल्डकपमध्ये दुसऱ्या संघावर आपला दबदबा कायम ठेवला आहे. भारता मागील सहा सामन्यांपैकी पाच सामने जिंकले आणि एक सामना रद्द झाला होता. भारत 11 अंकासह दुसरे स्थानावर आहे. न्यूझीलंड देखील 11 गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वर्ल्ड कप 2019 मध्ये आतापर्यंत भारताने दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि वेस्टइंडिजला पराभूत केलं आहे. भारताची आतापर्यंतची कामगिरी चांगली आहे. पण असं असताना देखील संघामधील 3 खेळाडूंच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. टीम इंडियामधील या तिन्ही खेळाडूंनी आतापर्यंत निराश केलं आहे. विराट कोहली सेमीफायनलच्या आधी संघात काही बदल करेल का याबाबत आता चर्चा सुरु आहे. विराटला सेमीफायलनच्या आधी इतर खेळाडूंना संधी देऊन त्यांची कामगिरी पाहावी लागणार आहे.


1. विजय शंकर


टीम इंडियामध्ये असलेल्या विजय शंकरला खास कामगिरी करता आलेली नाही. त्याने 3 सामन्यांमध्ये फक्त 58 रन केले आहेत. विजय शंकरला रायडूच्या जागी घेण्यात आलं होतं. विजय शंकरच्या जागी दिनेश कार्तिकला चौथ्या स्थानी घेण्याची मागणी होत आहे.


2. केएल राहुल 


ओपनर केएल राहुलने देखील चाहत्यांना निराश केलं आहे. पाकिस्तानच्या विरोधात त्याने 78 बॉलमध्ये 57 रन केले होते. त्यानंतर वेस्टइंडीज विरुद्ध त्याने 48 रन केले होते. दक्षिण आफ्रिकेच्या विरोधात 26 तर अफगाणिस्तानच्या विरोधात 30 रन त्याने केले होते. केएल राहुलच्या जागी आता ऋषभ पंतला ओपनिंगला संधी देण्याची मागणी होत आहे.


3. केदार जाधव 


वर्ल्डकपमध्ये केदार जाधवने ही काही खास कामगिरी केलेली नाही. त्यामुळे मधल्या फळीतील भारताची बाजू भक्कम झालेली नाही. जाधवने अफगाणिस्तानच्या विरोधात 68 बॉलमध्ये 52 रन केले होते. केदारच्या जागी रवींद्र जडेजाला संधी देण्याची मागणी होत आहे.