ICC bans Rizwan Javed : क्रिकेटमध्ये पुन्हा एकदा भ्रष्टाचार आणि मॅच फिक्सिंगचं (Match Fixing) प्रकरण समोर आलं आहे. याप्रकरणी आयसीसीने कठोर कारवाई करत इंग्लंडच्या खेळाडूवर तब्बल 17 वर्षांची बंदी घातली आहे. आबुधाबी टी10 क्रिकेट (Abu Dhabi T10 league) लीगमध्ये मॅच फिक्सिंगचा हा प्रकार समोर आला आहे. इंग्लंडचा क्लब क्रिकेटर रिझवान जावेद (Rizwan Jawed) या प्रकरणी दोषी आढळला आहे. आयसीसीने रिझवानवर साडे-सतरा वर्षांची बंदी घातलीय. ही बंदी इतकी मोठी आहे की या खेळाडूची क्रिकेट कारकिर्दच यात संपुष्टात येतेय. रिझवान जावेदवर 2021 मध्ये आबुधाबी टी10 लीगमध्ये मॅच फिक्सिंग केल्याचा ठपका ठेवण्यात आला होता. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रिझवान जावेदवर गंभीर आरोप
मॅच फिक्सिंगप्रकरणी रिझवान जावेदची चौकशी सुरु होती. त्याच्यावर लावण्यात आलेल्या आरोपांचं योग्य उत्तर देण्यात रिझवान अपयशी ठरला होता. त्यामुळे आयसीसीने रिझवानला दोषी मानत साडेसतरा वर्षांची बंदी घातली. 19 सप्टेंबर 2023 पासून ही बंदी लागू करण्यात आली आहे. एमिरात क्रिकेट बोर्डाच्या (ECB) अबुधावी टी10 लीगची सुरुवात 2017 मध्ये करण्यात आली. याप्रकरणी रिझवान जावेदसह आणखी आठ खेळाडू आणि अधिकाऱ्यांचा मॅचफिक्सिंग प्रकरणात समावेश आहे. आयसीसीने गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात या सर्वांवर आरोप ठेवले होते. 


प्रतिआव्हान देण्याची संधी नाही
रिझवान जावेद शिवाय बांगलादेशचा अष्टपैलू क्रिकेटर नासिर हुसैनवर सुद्धा मॅच फिक्सिंगचा आरोप आहे. त्याच्यावर दोन वर्षांची बंदी घालण्यात आली आहे. आयसीसी नियमानुसार रिझवानवर 2.1.1 , अनुच्छेद 2.1.3, अनुच्छेद 2.4.4 आणि अनुच्छेद 2.4.6 नुसार कारवाई करण्यात आली आहे. यात रिझवानला निकालाला प्रतिआव्हान करता येणार नाही.


आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्य मॅच फिक्सिंग
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्येही मॅच फिक्सिंगची अनेक प्रकरणं उघडकीस आली आहेत. यात आतापर्यंत 33 खेळाडूंवर कारवाई करण्यात आली आहे. भारताच्या माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन, अजय शर्मा, अजय जडेजा, मनोज प्रभाकर यांच्यावर मॅच फिक्सिंग प्रकरणी आरोप करण्यात आले होते. वर्ष 2000 मध्ये सट्टेबाजांबरोबर संगनमत केल्याचा आणि सट्टेबाजांना महिती पुरवल्याचा त्यांच्यावर आरोप होता. यापैकी मोहम्मद अझरुद्दीन आणि अजय शर्मा यांच्यावर आजीवन बंदी घालण्यात आली. तर अजय जडेजा आणि मनोज प्रभाकर यांच्यावर 5 वर्षांच्या बंदीची कारवाई करण्यात आली.


वर्ष 2000 मध्ये पाकिस्तानाच दिग्गज क्रिकेटपटू सलिम मलिक आणि अता-उर-रेहमानवरही आजीवन बंदी घालण्यात आली होती. याच वर्षी दक्षिण आफ्रिकेच्या हॅन्सी क्रोनिएवरही आजीवन बंदीची कारवाई करण्यात आली होती.