MS Dhoni : टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी (MahendraSingh Dhoni) निवृत्तीनंतरही सातत्याने चर्चेत असतो. धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली तरी आयपीएलमध्ये (IPL) तो अजूनही खेळतो. आयपीएलसंदर्भातच एका प्रकरणावर मद्रास हायकोर्टात (Madras High Court) सुनावणी झाली. हे प्रकरण महेंद्रसिंग धोनीची जोडलं गेलं आहे. एका आयपीएस अधिकाऱ्याने एमएस धोनीवर काही आरोप केले होते. ज्याविरोधात एमएस धोनी कोर्टात धाव घेतली होती. या प्रकरणात सुनावणी करताना मद्रास हायकोर्टाने आरोप करणाऱ्या अधिकाऱ्याला तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मद्रास हायकोर्टाने आयपीएस अधिकारी संपत कुमार यांना 15 दिवसांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. कोर्टाचं अवमान केल्याप्रकरणी ही शिक्षा देण्यात आलीय. शिक्षा सुनावली असली तरी संपत कुमार यांना तात्काळ अटक केली जाणार नाहीए. त्यांना आपली बाजू मांडण्यासाठी 30 दिवसांचा अवधी देण्यात आला आहे. 


काय आहे प्रकरण?
आपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार असलेल्या एमएस धोनीने मद्रास हायकोर्टात एक याचिका दाकल केली होती. यात एका मिडिया चॅनल, एक अधिकारी आणि काही इतर लोकांविरोधात चुकीचे आरोप केल्याची तक्रार करण्यात आली होती. 2013 मध्ये आयपीएल फिक्सिंग प्रकरणात चुकीच्या पद्धतीने आपलं नाव गोवण्यात आल्याचा आरोप धोनीने केला होता. धोनीच्या या याचिकेवर निर्णय देताना याप्रकरणात कोणताही सबूत नसताना चुकीचे आरोप लावू नयेत अशी समज दिली होती. आयपीएस अधिकारी संपत कुमार यांना सोडून इतर सर्वांनी कोर्टाच्या आदेशाचं पालनं केलं. 


संपत कुमार यांनी मात्र कोर्टाच्या आदेशानंतरही एमएस धोनीवर आरोप करणं सुरु ठेवलं.  धोनीच्या टीमने  ही बाब कोर्टाच्या निदर्शनास आणून दिली. संपत कुमार यांच्याविरोधात पुन्हा कोर्टात तक्रार करण्यात आली. यावर सुनावणी करताना कोर्टाने आयपीएस अधिकारी संतप कुमार यांना पंधरा दिवसांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली.


हे ही वाचा : आता मैदानावर कधीच दिसणार नाही एम एस धोनीची 7 नंबरची जर्सी, बीसीसीआयचा मोठा निर्णय


नव्या हंगामातही दिसणार धोनी
एमएस धोनीने 2020 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. पण तो आयपीएलमध्ये अजूनही खेळतो. आता नव्या हंगामात म्हणजे 2024 मध्येही धोनी चेन्नई सुपर किंग्सचं नेतृत्व करताना दिसणार आहे. चेन्नई सुपर किंग्सने खेळाडूंच्या रिटेन लिस्टमध्ये एमएस धोनीचं नाव कायम ठेवलं आहे. धोनीच्या नेतृत्वाखाली सीएसकेने तब्बल पाचवेळा आयपीएलच्या ट्रॉफीवर नाव कोरलं आहे. गेल्या म्हणजे 2023 च्या आयपीएल हंगामातही धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नईनं आयपीएलचं जेतेपद पटकावलं होतं.