आता मैदानावर कधीच दिसणार नाही एम एस धोनीची 7 नंबरची जर्सी, बीसीसीआयचा मोठा निर्णय

MS Dhoni Jersey : भारतीय क्रिकेट इतिहसातील सर्वात यशस्वी कर्णधार असलेल्या महेंद्रसिंग धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून घेऊन आता जवळपास तीन वर्ष होऊन गेलीत. त्याच्या सन्मानार्थ बीसीसीआयने एक मोठा निर्णय घेतला आहे. 

राजीव कासले | Updated: Dec 15, 2023, 01:20 PM IST
आता मैदानावर कधीच दिसणार नाही एम एस धोनीची 7 नंबरची जर्सी, बीसीसीआयचा मोठा निर्णय title=

MS Dhoni Jersey : भारतीय क्रिकेट इतिहसातील सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक म्हणजे महेंद्रसिंग धोनी (Mahedrdasingh Dhoni). धोनीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने (Team india) 2007 मध्ये टी20 विश्वचषक, 2011 मध्ये एकदिवसीय विश्वचषक जिंकण्यची किमया साधली. तर कसोटी क्रिकेटमध्येही त्याच्या नेतृत्वाखील टीम इंडिया नंबर वन बनली. आता त्याच्या सन्मानार्थ भारतीय क्रिकेट बोर्डाने मोठा निर्णय घेतला आहे. बीसीसीआयने धोनी परिधान करत असलेली सात नंबरची जर्सी रिटायर्ड करण्याचा (Dhoni Jersey no 7 Retire) निर्णय घेतला आहे. याआधी बीसीसीआयने 2017 मध्ये सचिन तेंडुलकर परिधान करत असलेली 10 नंबरची जर्सी रिटायर्ड केली होती. 

महेंद्रसिंग धोनी मैदानावर 7 नंबरची जर्सी परिधान करुन उतरला होता, नंतर तोच जर्सी क्रमांक त्याची ओळख बनली. महेंद्रसिंग धोनीचं टीम इंडिया क्रिकेटमधलं योगदान लक्षात घेता बीसीसीआयने त्यांची 7 क्रमांकाची जर्सी यापुढे कोणत्या खेळाडूला न देण्याचा निर्णय घेतला आहे. हा नंबर आता कायमचा धोनीसाठीच रहाणार आहे. 

कोणत्याही युवा खेळाडूने जर्सीसाठी सात हा क्रमांक निवडू नये अशी सूचना बीसीसीआयने केली आहे. म्हणजे यापुढे 10 आणि 7 क्रमांक कोणत्या खेळाडूला मिळणार नाही. भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूरने सुरुवातीच्या काही काळासाठी 10 क्रमांकाची जर्सी परिधान केली होती. पण यानंतर त्याला दुसरा नंबर देण्यात आला. त्यामुळे जर्सी क्रमांक 7 साठी बीसीसीआयने तात्काळ अॅक्शन घेतली आणि हा क्रमांक कोणत्याही खेळाडूला न देण्याचा निर्णय घेतला. भविष्यात खेळाडूंना 60 क्रमांकापर्यंत निवड करण्याचा पर्याय देण्यता आला आहे. 

जर्सी नंबर निवडण्याचा नियम
आयसीसीच्या नियमानुसार खेळाडूकडे 1 ते 100 क्रमांकापैकी कोणताही क्रमांक निवडण्याचा पर्याय असतो. पण भारतात खेळाडूंसाठी मर्यादीत पर्यात उपलब्ध आहेत. खेळाडू 60 पर्यंत क्रमांक निवडू शकतात. त्यामुळे एखादा खेळाडू एक वर्ष भारतीय संघाबाहेर असला  तरी त्याच्या जर्सीचा क्रमांक इतर कोणत्या खेळाडूला दिला जात नाही. 

जयस्वालला मिळाला नाही मनासारखा क्रमांक
भारताचा युवा फलंदाज शुभमन गिलने 7 क्रमांकासाठी इच्छा व्यक्त केली होती. सात हा त्याचा लकी क्रमांक आहे. पण त्याला तो क्रमांक देण्यात आला नव्हता, त्यामुळे त्याने जर्सीसाठी डबल सात म्हणजे 77 क्रमांक निवडला. 21 वर्षांचा आक्रमक डावखुला फलंदाज यशस्वी जयस्वालही 19 क्रमांकासाठी इच्छूक होता. पण हा जर्सी क्रमांका दिनेश कार्तिकचा आहे. सध्या तो टीम इंडियात खेळत नाही, पण त्याने अद्याप निवृत्ती जाहीर केलेली नाही.त्यामुळे जयस्वालला 64 क्रमांक जर्सीसाठी देण्यात आला.

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x