Electra Stumps: क्रिकेटमध्ये नव्या स्टम्पची एन्ट्री, विकेटच नाही तर चौकार-षटकरांसाठीही पेटणार वेगवेगळी लाईट
Electra Stumps In Big Bash League: क्रिकेटच्या मैदानात आता नव्या युगातील अत्याधुनिक स्टम्पची एन्ट्री झाली आहे. या स्टम्पमध्ये विविध आकर्षक लाईटिंग दिसणार आहे. बिग बॅश लीगमध्ये या स्टम्पचा वापर केला जाणार आहे.
Electra Stumps In Big Bash League : बदलत्या काळानुसार आता क्रिकेटच्या मैदानातही बदल पाहिला मिळणार आहेत. मैदानात आता नवे अत्याधुनिक स्टम्प पाहिला मिळणार आहेत. या स्टम्पला इलेक्ट्रा स्टम्प्स (Electra Stumps) असं नाव देण्यात आलं आहे. याचं वैशिष्ट्य म्हणजे विकेट असो की नोबॉल, चौकार असो षटकार या स्टम्प्समध्ये वेगवेगळी लाईट पेटणार आहे. ऑस्ट्रेलियातली टी20 लीग बिग बॅशमध्ये (Big Bash League) या नव्या स्टम्प्सचा वापर करण्यात आला आहे. याआधी महिलांच्या बिग बॅश लीगमध्ये (WBBL) या स्टम्प्सचा वापर करण्यात आला होता. संपूर्ण स्टम्पमध्ये असलेली लाईटिंग याचं आकर्षण आहे.
महिला बीग बॅशमध्ये इलेक्ट्रा स्टम्पचा वापर केल्यानंतर आता पुरुष बीग बॅश लीगमध्ये दिसणार आहे. अंपायरच्या निर्णयाप्रमाणे या स्टम्प्समध्ये विविध लाईट पेटतील. म्हणजे अंपायरने नो-बॉल दिला किंवा बाऊंड्री दिली इतकंच काय तर टाइम आऊटसाठीही लाईट पेटणार आहे. बिग बॅश लीगपूर्वी मार्क वॉ आणि मायकेल वॉनने इलेक्ट्रा स्टम्प्सबाबत सविस्तर माहिती दिली.
कसे काम करणार इलेक्ट्रा स्टम्प्स
विकेट : एखादा फलंदाज बाद झाल्यास मग तो कोणत्याही पद्धतीने बाद झाला तरी स्टम्पमध्ये लाल लाईट पेटेल
चौकार : फलंदाजाने चौकार मारल्यानंतर चेंडूने बाऊंड्रीला टच केल्यावर स्टम्पमधली लाईट वेगाने बदलत राहिल.
षटकार : फलंदाजाने षटकार मारल्यानंतर स्टम्पमधली लाईट वेगवेगळ्या रंगात स्क्रोल होत राहिल.
नो बॉल - गोलंदाजाने नो बॉल टाकल्यानंतर अंपारच्या इशाऱ्यावर स्टम्पमध्ये लाल आणि सफेद रंगाची लाईच पेटेल
दोन षटकांच्या मध्ये : एक षटक संपल्यानंतर आणि दुसरं षटक सुरु होण्याच्या मधल्या वेळेत स्टम्पमध्ये जांभळ्या आणि निळ्या रंगाची लाईट पेटेल
आताचे स्टम्प्स कोणते आहेत?
क्रिकेटच्या मैदानात सध्या एलईडी स्टम्प्सचा वापर केला जातो. आंतरराष्ट्रीय सामन्यादरम्यान वापरण्यात येणारे LED स्टंप्स हे सामन्यात अंपायर्सना योग्य निर्णय घेण्यासाठी मदत करत असतात. पहिल्यांदा या स्टम्पचा वापर 2014 च्या आयसीसी टी 20 वर्ल्ड कप सामन्यात करण्यात आला होता. हे स्टम्प खूप महागडे आहेत. या स्टम्पची किंमत जवळपास 50 ते 60 लाख रुपये इतकी आहे. याआधी क्रिकेट सामन्यांमध्ये लाकडी स्टंप्सचा उपयोग केला जायचा. पण आता सर्वच आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांमध्ये याचा उपयोग केला जातो. LED स्टंप्सचा शोध हा ऑस्ट्रेलियाच्या ब्रोंटी एकरमेन याने लावला होता.