मुंबई : आयपीएल सीझन ११ मध्ये बंगळुरचा संघ प्ले-ऑफआधीच बाद झाला असला तरी, विराट कोहली सेनेचा  ए.बी. डिविलियर्सच्या पराक्रमाची खास आठवण स्मरणात कायम राहिली आहे. त्याचीच पुनरावृत्त भारतीय महिला क्रिकेट खेळाडूने करुन दाखवली आहे.  डिविलियर्सच्या 'सुपरमॅन' स्टाइल कॅचची चर्चा होत असताना महिला क्रिकेट संघाची स्टार हरमनप्रीत कौरच्या एका जबरा झेलने क्रिकेटप्रेमींना 'वेड' केलेय. तिचा हा झेल पाहून तिला 'सुपरगर्ल'चीच उपमा दिली जात आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


सुपरनोवास विरुद्ध ट्रेलब्लेझर्स या दोन संघांमध्ये काल महिला टी-२० चा विशेष सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर झाला. त्यात हरमनप्रीतच्या सुपरनोवास संघाने ३ विकेट्सनी विजय साकारला. दरम्यान, हरमनप्रीतच्या झेलने सगळ्यांचीच वाहवा मिळवली. स्मृती मानधनाचा उंच उडालेला फटका हरमनने हवेत झेपावत टीपला, तेव्हा सगळ्यांच्याच डोळ्यापुढे ए.बी. डिविलियर्स उभा राहिला. हरमनप्रीतच्या झेलचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.


पाहा हा व्हिडिओ