Haryana Vidhan Sabha Elections Result 2024 : हरियाणा राज्यात नुकतीच विधानसभा निवडणूक पार पडली असून याचे निकाल 8 ऑक्टोबर रोजी जाहीर होणार आहेत. हरियाणा येथील तोशाम जागेची मतमोजणी सुरु असून येथे सध्या भाजपची उमेदवार श्रुती चौधरी ही काँग्रेसचे उमेदवार अनिरुद्ध चौधरी यांच्यापेक्षा 8665  मतांनी आघाडीवर आहे.  श्रुतीला आतापर्यंत 43338 मतं मिळाली आहेत. तोशाम हरियाणा निवडणुकीतील सर्वात चर्चित जागा असून येथे काँग्रेसचे उमेदवार अनिरुद्ध चौधरी यांचा प्रचार करण्यासाठी माजी क्रिकेटर वीरेंद्र सेहवाग आला होता. 


निवडणुकीच्या रिंगणात भाऊ बहिणीची टक्कर : 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हरियाणा निवडणुकीत तोशाम जागेवरून राजकारणातील एका कुटुंबाचे दोन सदस्य वेगवेगळ्या पक्षाकडून निवडणूक लढत आहे. तोशाम या जागेवर भाजपने माजी मुख्यमंत्री बंसीलाल यांची नातं आणि किरण चौधरींची मुलगी श्रुती हिला तर तिकीट दिलं. तर काँग्रेसने बंसीलालचा नातू आणि श्रुती हिच्या काकांचा मुलगा अनिरुद्ध चौधरी यांना विधानसभेचं तिकीट दिलं. आतापर्यंत माजी मुख्यमंत्री बंसीलाल यांची तोशाम जागेवरील पकड त्यांचा मुलगा किरण चौधरी यांनी मजबूत ठेवली होती. किरण हे तब्बल 5 वेळा या जागेवरून आमदार म्हणून निवडणून आले. परंतु आता अनिरुद्ध चौधरी निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याने ही लढत अतिशय चुरशीची झाली होती. 


हेही वाचा : राजकारणाच्या आखाड्यात कुस्तीपटू विनेश फोगटचा विजय, भाजप उमेदवाराचा केला पराभव


 


तोशाम जागेसाठी वीरेंद्र सेहवागने केला होता प्रचार : 


हरियाणा विधानसभा निवडणुकीत तोशाम जागेवरून निवडणूक लढणारे काँग्रेस उमेदवार अनिरुद्ध चौधरी यांच्यासाठी माजी क्रिकेटर वीरेंद्र सेहवाग याने प्रचार केला होता.  यावेळी वीरेंद्र सेहवागने म्हंटले होते की ' आशा करतो की तोशामची जनता अनिरुद्ध चौधरी यांना भरपूर मतं देऊन विजयी करतील. 


हेही वाचा : टीम इंडियाचा स्टार क्रिकेटर बनणार 'बापमाणूस', व्हिडीओ शेअर करून फॅन्सना दिली गुडन्यूज


 


सेहवागने अनिरुद्धला म्हटलं होतं मोठा भाऊ : 


वीरेंद्र सेहवाग जेव्हा तोशाम येथे प्रचारासाठी आला होता तेव्हा त्याने म्हंटले होते की, 'मी माझं कर्तव्य निभावतोय. आमच्या इथे असं होतं की असतं की मोठा भाऊ कोणतंही काम करत असेल तेव्हा परिवारातील सर्वजण त्याला पाठिंबा देतात'. अनिरुद्धने म्हंटले की, 'साधारणपणे क्रिकेटर्स निवडणुकीत प्रचारासाठी येत नाहीत. पण वीरेंद्र सेहवाग नेहमी प्रचारासाठी येतो. मला कधी बोलायची गरज पडत नाही.