ICC Ranking मध्ये टीम इंडियाचा दबदबा, यशस्वीची तिसऱ्या नंबरवर झेप तर कोहलीचे टॉप 10 मध्ये पुनरागमन
नुकत्याच झालेल्या भारत बांगलादेश सीरिजमध्ये केलेल्या जबरदस्त परफॉर्मन्सचा टीम इंडियाच्या खेळाडूंना फायदा झाला असून अनेकांनी रँकिंग टेबलमध्ये वरच्या क्रमांकावर झेप घेतली आहे.
ICC Lastest Ranking : क्रिकेटच्या वनडे, टेस्ट आणि टी 20 अशा तीनही फॉरमॅटसाठी आयसीसीची रँकिंग समोर आली असून यात टीम इंडियाचा दबदबा पाहायला मिळत आहे. नुकत्याच झालेल्या भारत बांगलादेश सीरिजमध्ये केलेल्या जबरदस्त परफॉर्मन्सचा टीम इंडियाच्या खेळाडूंना फायदा झाला असून अनेकांनी रँकिंग टेबलमध्ये वरच्या क्रमांकावर झेप घेतली आहे.
जसप्रीत बुमराह टेस्टमध्ये नंबर 1 चा गोलंदाज :
टेस्ट क्रिकेटमध्ये गोलंदाजांच्या आयसीसी रँकिंगमध्ये जसप्रीत बुमराहने त्याचे नंबर एकचे स्थान कायम ठेवले आहे. त्याने बांगलादेश विरुद्ध 11 विकेट्स घेतले होते. ज्याचा त्याला फायदा मिळाला असून नंबर 1 वर त्याची दावेदारी अधिक मजबूत झाली आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर आर अश्विन असून बुमराहच्या तुलनेत तो फक्त एक पॉईंट कमी आहे. बुमराहच्या नावावर 870 रेटिंग पॉइंट्स आहेत. तर अश्विनच्या नावावर 869 रेटिंग पॉइंट्स आहेत. रवींद्र जडेजाचाही टॉप 10 मध्ये सहभाग असून तो 809 रेटिंग पॉइंट्स सह सहाव्या स्थानी आहे.
यशस्वी जयस्वालची तिसऱ्या स्थानी झेप :
टेस्ट फलंदाजांच्या आयसीसी रँकिंगमध्ये बांगलादेश विरुद्ध दमदार परफॉर्मन्स केलेला यशस्वी जयस्वालने नंबर ३ च्या स्थानावर झेप घेतली आहे. तर विराट कोहलीचे टॉप 10 मध्ये पुनरागमन झाले असून तो सध्या ६ व्या स्थानावर आहे. तर ऋषभ पंत टेस्ट रँकिंगमध्ये 718 रेटिंग पॉइंट्स सह 9 व्या स्थानी आहे. टेस्ट फलंदाजांच्या आयसीसी रँकिंगमध्ये नंबर 1 वर इंग्लंडचा फलंदाज जो रूट आहे.
हेही वाचा : धोनीला भेटण्यासाठी 1200 किलोमीटरचा सायकल प्रवास, 7 दिवस टेंटमध्ये राहिला, पण थालाने ढुंकूनही पाहिलं नाही
वनडे बॅटिंग रँकिंगमध्ये तीन भारतीय फलंदाज :
वनडे बॅटिंग रँकिंगच्या टॉप 10 मध्ये तीन भारतीय फलंदाजांचा समावेश असून या रँकिंगमध्ये कोणताही बदल झालेला नाही. या रँकिंगमध्ये पाकिस्तानचा फलंदाज बाबर आझम नंबर 1 वर असून त्याच्या खाली रोहित शर्मा नंबर 2, शुभमन गिल नंबर तीन तर विराट कोहली चौथ्या क्रमांकावर आहे. वनडेत गोलंदाजीच्या रँकिंगमध्ये बदल झाले असून यात कुलदीप यादवचा फायदा झाला आहे. एकही मॅच न खेळता कुलदीप यादव नंबर तीनवर पोहोचला आहे.
सूर्या दुसऱ्या क्रमांकावर :
टी 20 फॉरमॅट फलंदाजांच्या आयसीसी रँकिंगमध्ये कोणतेही बदल झालेली नाहीत. दुसऱ्या क्रमांकावर सूर्यकुमार यादव असून पहिल्या स्थानावर ट्रेव्हिस हेड कायम आहे. तर यशस्वी जयस्वाल चौथ्या आणि ऋतुराज गायकवाड नवव्या स्थानावर आहे. टी 20 गोलंदाजांच्या टॉप 10 रँकिंगमध्ये एकही भारतीय गोलंदाज नाही. यात रवी बिष्णोई 11 व्या स्थानी असून अक्षर पटेल 12 व्या स्थानी आहे.