IND VS BAN 2nd Test 4th Day : भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यात कानपुर येथे दुसरा टेस्ट सामना खेळवला जात आहे. सोमवारी टेस्ट सामन्याचा चौथा दिवस असून या दिवशी भारताने फलंदाजी करताना 285 धावा केल्या. यात टीम इंडियाचा युवा गोलंदाज आकाश दीपने विराट कोहलीने त्याला गिफ्ट केलेल्या बॅटने गगनचुंबी सिक्स ठोकले. हे सिक्स पाहून स्वतः कोहलीसुद्धा हैराण झाला.  


आकाश दीपने ठोकले 2 सिक्स : 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

34 व्या ओव्हरला आर अश्विनची विकेट गेल्यावर आकाश दीप मैदानात आला. काही दिवसांपूर्वी विराट कोहलीने आकाश दीपला त्याची बॅट गिफ्ट केली होती. याबाबत आकाशने इंस्टाग्राम स्टोरी ठेऊन माहिती दिली. आकाश दीप बांगलादेश विरुद्ध फलंदाजीसाठी विराटने गिफ्ट केलेलीच बात घेऊन मैदानात उतरला. यावेळी त्याने केएल राहुल सोबत टीम इंडियासाठी धावा करण्याचा प्रयत्न केला. आकाश दीपने यावेळी 2 बॉलमध्ये 2 सिक्स ठोकले. हे सिक्स पाहून ड्रेसिंग रूम बाहेर बसलेला विराट कोहली सुद्धा शॉक झाला. रोहित शर्मा आणि हेड कोच गौतम गंभीर सुद्धा आकाशच्या या सिक्सचा रिप्लेस पुन्हा पुन्हा पाहून त्याची प्रशंसा करताना दिसले. 


चौथ्या दिवशी काय घडलं? 


भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातील दुसरा टेस्ट सामना 27 सप्टेंबर पासून कानपुर येथे खेळवण्यात येत आहे. सामन्याच्या पहिल्या दिवशी भारताने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. परंतु पहिल्याच दिवशी पावसाच्या आगमनामुळे केवळ 35 ओव्हर खेळवण्यात आल्या. यात भारताने बांग्लादेशच्या तीन विकेट्स घेतल्या होत्या आणि बांगलादेशने 107 धावा केल्या होत्या. त्यानंतर दुसऱ्याही दिवशी पावसाने जोरदार बॅटिंग केल्याने खेळ एकही बॉल न खेळवता रद्द झाला  तर तिसऱ्या दिवशी मैदान ओलसर असल्याने खेळ रद्द करण्यात आला.  मात्र चौथ्या दिवशी पावसाने विश्रांती घेतल्याने खेळ सुरु करण्यात आला. यावेळी बांगलादेशने पहिल्या इनिंगमध्ये 233 धावा केल्या. तर टीम इंडियाने फलंदाजी करताना बांगलादेशची आघडी मोडीत काढून 285 धावा केल्या. परंतु 9 विकेट्स गेल्यावर रोहितने फलंदाजांना बोलावून घेतले त्यामुळे 285 धावांवर खेळ आटोपला. तर चौथ्या दिवसाअंती बांगलादेशने पुन्हा फलंदाजी करताना 2 विकेट्स गमावून 26 धावा केल्या. 



हेही वाचा : टेस्टमध्ये टी20 क्रिकेटची मजा, टीम इंडियाकडून बांगलादेशची धुलाई... मोडला 'हा' रेकॉर्ड


भारताची प्लेईंग 11 :


यशस्वी जयसवाल, रोहित शर्मा (कर्णधार ), शुभमन गिल, विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकीपर), केएल राहुल, रवींद्र जड़ेजा, रविचंद्रन अश्विन, आकाश दीप, जसप्रित बुमरा, मोहम्मद सिराज


बांगलादेशची प्लेईंग 11 :


शादमान इस्लाम, जाकिर हसन, नजमुल हुसैन शान्तो (कर्णधार ), मोमिनुल हक, मुश्फिकुर रहीम, शाकिब अल हसन, लिट्टन दास (विकेटकीपर), मेहदी हसन मिराज, तैजुल इस्लाम, हसन महमूद, खालिद अहमद