टेस्टमध्ये टी20 क्रिकेटची मजा, टीम इंडियाकडून बांगलादेशची धुलाई... मोडला 'हा' रेकॉर्ड

IND VS BAN 2nd Test, Team India Fastest Hundred Record: कानपुर टेस्टच्या चौथ्या दिवशी टीम इंडियाच्या फलंदाजांनी बांगलादेशची धुलाई करून टेस्ट क्रिकेटमध्ये टी 20 सारखी मजा आणली. टीम इंडियाच्या फलंदाजांनी बांगलादेशच्या गोलंदाजांचा घाम फोडत टेस्ट क्रिकेटमध्ये स्वतःचाच रेकॉर्ड मोडला. 

पुजा पवार | Updated: Sep 30, 2024, 04:08 PM IST
टेस्टमध्ये टी20 क्रिकेटची मजा, टीम इंडियाकडून बांगलादेशची धुलाई...  मोडला 'हा' रेकॉर्ड title=
(Photo Credit : Social Media)

IND VS BAN 2nd Test, Team India Fastest Hundred Record: भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातील टेस्ट सीरिजमधील दुसरा सामना कानपूर येथे खेळवला जात आहेत. कानपुर टेस्टच्या चौथ्या दिवशी टीम इंडियाच्या फलंदाजांनी बांगलादेशची धुलाई करून टेस्ट क्रिकेटमध्ये टी 20 सारखी मजा आणली. टीम इंडियाच्या फलंदाजांनी बांगलादेशच्या गोलंदाजांचा घाम फोडत टेस्ट क्रिकेटमध्ये स्वतःचाच रेकॉर्ड मोडला. 

टीम इंडियाने रचला इतिहास : 

टीम इंडियाच्या गोलंदाजांनी चौथ्या दिवशी बांगलादेशला 233 धावांवर ऑल आउट केले. त्यानंतर बांगलादेशची ही आघाडी मोडण्यासाठी टीम इंडियाकडून यशस्वी जयस्वाल आणि कॅप्टन रोहित शर्मा यांची सलामी जोडी उतरली. टीम इंडियाचे सलामी फलंदाज यशस्वी जयस्वाल आणि रोहित शर्मा या दोघांच्या जोडीने टेस्ट क्रिकेटमध्ये सर्वात जलद 50 धावा करण्याचा विक्रम रचला. टीम इंडिया इथवरच थांबली नाही तर त्यांनी अवघ्या 10.1 ओव्हरमध्ये 103 धावा करून टेस्टमध्ये सर्वात जलद 100 धावांचा टप्पा पूर्ण करण्याचा स्वतःचाच विक्रम मोडला. यावर्षीच वेस्ट इंडिजविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात इंग्लंडने अवघ्या 4.2 ओव्हरमध्ये 50 धावांचा टप्पा गाठला होता. मात्र टीम यशस्वी आणि रोहितच्या जोडीने इंग्लंडचा हा विक्रम मोडला.  तर भारताने 2023 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध 12.2 ओव्हरमध्ये 100 धावा पूर्ण केल्या होत्या. वर्षभरातच भारताने हा विक्रम पुन्हा मोडीत काढला.

हेही वाचा : बुमराह ने किया गुमराह... बांगलादेशी बॅट्समनला काही कळायच्या आतच दांड्या गूल; Video पाहाच

दोन दिवसांनी सुरु झाला खेळ : 

भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातील दुसरा टेस्ट सामना 27 सप्टेंबर पासून कानपुर येथे खेळवण्यात येत आहे. सामन्याच्या पहिल्या दिवशी भारताने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. परंतु पहिल्याच दिवशी पावसाच्या आगमनामुळे केवळ 35 ओव्हर खेळवण्यात आल्या. यात भारताने बांग्लादेशच्या तीन विकेट्स घेतल्या होत्या आणि बांगलादेशने 107 धावा केल्या होत्या. त्यानंतर दुसऱ्याही दिवशी पावसाने जोरदार बॅटिंग केल्याने खेळ एकही बॉल न खेळवता रद्द झाला  तर तिसऱ्या दिवशी मैदान ओलसर असल्याने खेळ रद्द करण्यात आला. 

भारताची प्लेईंग 11 :

यशस्वी जयसवाल, रोहित शर्मा (कर्णधार ), शुभमन गिल, विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकीपर), केएल राहुल, रवींद्र जड़ेजा, रविचंद्रन अश्विन, आकाश दीप, जसप्रित बुमरा, मोहम्मद सिराज

बांगलादेशची प्लेईंग 11 :

शादमान इस्लाम, जाकिर हसन, नजमुल हुसैन शान्तो (कर्णधार ), मोमिनुल हक, मुश्फिकुर रहीम, शाकिब अल हसन, लिट्टन दास (विकेटकीपर), मेहदी हसन मिराज, तैजुल इस्लाम, हसन महमूद, खालिद अहमद