अश्विन काय ऐकत नाय! कानपूरमध्ये विकेट घेऊन रचला इतिहास, मोडला अनिल कुंबळेचा `हा` विक्रम
IND VS BAN 2nd Test : भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यात दुसरा टेस्ट सामना खेळवला जात आहे. या सामन्यात टीम इंडियाचा अनुभवी गोलंदाज आर अश्विन याने बांग्लादेशची एक विकेट घेऊन इतिहास रचला.
IND VS BAN 2nd Test : कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमवर भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यात दुसरा टेस्ट सामना खेळवला जात आहे. या सामन्यात टीम इंडियाचा अनुभवी गोलंदाज आर अश्विन याने बांग्लादेशची एक विकेट घेऊन इतिहास रचला. आर अश्विनने आशियातील खेळपट्ट्यांवर 420 वी विकेट घेतली आणि यासह तो आशियायी खेळपट्ट्यांवर सर्वाधिक विकेट्स घेणारा एकमेव भारतीय गोलंदाज ठरला आहे.
भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यात दोन सामन्यांची टेस्ट सीरिज खेळवली जात असून यातील पहिला सामना हा चेन्नई येथे खेळवला गेला. चेन्नईतील या सामन्यात टीम इंडियाने बांगलादेशचा 280 धावांनी पराभव केला होता. या सामन्यात आर अश्विनने टीम इंडिया संकटात असताना 113 धावा करून शतक ठोकले होते, तर गोलंदाजी करतानाही 6 विकेट्स घेऊन त्याने विक्रम रचला होता. आता कानपूर टेस्टमध्येही आर अश्विनने त्याचा हाच फॉर्म कायम ठेवत इतिहास रचला आहे.
आर अश्विनने मोडला कुंबळेचा विक्रम :
आर अश्विन कानपूरमध्ये त्याच्या टेस्ट कारकिर्दीतील 100 वा सामना खेळत असून यात त्याने आतापर्यंत 522 विकेट्स घेतले आहेत. दुसऱ्या टेस्ट सामन्यात अश्विनने बांगलादेशचा कर्णधार शांतोला 29 व्या ओव्हरला बाद केले. अश्विनच्या बॉलवर शांतो एलबीडब्ल्यू बाद झाला. ही अश्विनने आशियायी खेळपट्टीवर घेतलेली 420 वी विकेट होती. यासह अश्विनने भारताचे माजी क्रिकेटर अनिल कुंबळे यांचा विक्रम मोडला. अश्विनपूर्वी अनिल कुंबळे हे पहिले भारतीय गोलंदाज होते ज्यांनी आशियायी खेळपट्टीवर सर्वाधिक 419 विकेट्स घेतले होते. आशियायी खेळपट्टीवर सर्वाधिक विकेट घेणारा आर अश्विन हा पहिला भारतीय गोलंदाज तर जागतिक क्रिकेटमध्ये दुसरा गोलंदाज ठरला आहे. तर एम मुरलीधरन याच्या नावावर सर्वाधिक 612 विकेट्सचा विक्रम आहे.
आशियायी खेळपट्टीवर सर्वाधिक टेस्ट विकेट्स घेणारे गोलंदाज :
612 एम मुरलीधरन
420 आर अश्विन*
419 अनिल कुंबळे
354 रंगना हेरथ
300 हरभजन सिंग
भारताची प्लेईंग 11 :
यशस्वी जयसवाल, रोहित शर्मा (कर्णधार ), शुभमन गिल, विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकीपर), केएल राहुल, रवींद्र जड़ेजा, रविचंद्रन अश्विन, आकाश दीप, जसप्रित बुमरा, मोहम्मद सिराज
बांगलादेशची प्लेईंग 11 :
शादमान इस्लाम, जाकिर हसन, नजमुल हुसैन शान्तो (कर्णधार ), मोमिनुल हक, मुश्फिकुर रहीम, शाकिब अल हसन, लिट्टन दास (विकेटकीपर), मेहदी हसन मिराज, तैजुल इस्लाम, हसन महमूद, खालिद अहमद