मुंबई : इंग्लंडचा माजी कर्णधार माईक ऍथर्टने (Mike Atherton) सांगितले की,  इंग्लंड टीमची सध्याची परिस्थिती पाहाता यावर्षी टी -20 वर्ल्ड कप (T20 World Cup) जिंकण्यासाठी भारतच प्रबळ दावेदार आहे. अष्टपैलू रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) , वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) आणि मोहम्मद शमी (Mohammad Shami) विनाही शनिवारी पाच मॅचच्या या टी -20 सीरीजमध्ये भारताने जगातील पहिल्या क्रमांकाच्या (England number 1 Team)टीमला  3-2ने पराभूत केलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अ‍ॅथर्टनने(Mike Atherton)स्काय स्पोर्ट्सला सांगितले की, "भारताकडे अधिक सामर्थ्य आहे आणि ते कदाचित इंडियन प्रीमियर लीग (IPL) आणि  टी -२० क्रिकेट खेळल्यामुळे आहे, आणि खरेतर हेच आहे की, भारताने तीन मुख्य गोलंदाजांशिवाय इंग्लंडला हरवले आहे."


इंग्लंडचे 54  टेस्ट मॅचमध्ये नेतृत्व करणारे अ‍ॅथर्टन पुढे म्हणाले की, " या पुढे भारतासाठी सर्व काही सोपे होणार नाही. इंग्लंड हा एक चांगला संघ आहे आणि वेस्ट इंडीज आणि इतर संघदेखील तितकेच धोकादायक आहेत."


इंग्लंडचा आणखी एक माजी कर्णधार मायकेल वॉनने (Michael Vaughan) टी -20 सीरीज जिंकल्याबद्दल भारताचे कौतुक केले आणि म्हणाला की, जडेजा (Jadeja) आणि बुमराह (Bumrah) यांच्या सहभागामुळे टी -20 वर्ल्डकप खेळण्यासाठी संघ अधिक बळकट होईल.



वॉनने ट्विट केले की, "भारताने या सीरीजमध्ये अतिशय चमकदार कामगिरी करुन परिस्थितीशी जुळवून घेतले आणि एक चांगले संघ जिंकला. या परिस्थितीत जसप्रीत बुमराह आणि रवींद्र जडेजाला भारतीय टीममध्ये समावेश केल्यास टी -२० वर्ल्डकप जिंकण्यासाठी भारतचं प्रबळ दावेदार असेल. शनिवारी भारताने इंग्लंडला 36 धावांनी पराभूत करून पाच सामन्यांची टी -२० सीरीज 3-2 ने जिंकली.