Pakistan Cricket, World Cup 2023 : एशिया कप स्पर्धेत बाबर आझमच्या (Babar Azam) नेतृत्वाखालील पाकिस्तान क्रिकेट संघाला (Pakistan Cricket Team) लाजीरवाणा पराभव पत्करावा लागला होता. भारताने पाकिस्तानचा दारुण पराभव केला. त्यानंतर श्रीलंकेनेही मात केली. या धक्क्यातून सावरत पाकिस्तानचा संघ भारतात होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेसाठी (ODI World Cup 2023) सज्ज होताय. पण त्यापूर्वीच त्यांना आणखी एक धक्का बसला आहे. यामुळे पाकिस्तानचा संघ विश्वचषक स्पर्धेपूर्वी बहिष्काराच्या (Boycott) मूडमध्ये आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारतात 5 ऑस्टोबर ते 19 नोव्हेंबरदरम्यान एकदिवसीय विश्वचषक स्पर्धा खेळवली जाणार आहे. पाकिस्तानाच पहिला सामना 6 ऑक्टोबरला नेदरलँडशी (Pakistan vs Netherland) रंगणार असून हा सामना हैदराबादला (Hyderabad) खेळवला जाणार आहे. त्याआधी पाकिस्तानाचा संघ सराव सामना खेळणार आहे. 29 सप्टेंबरला पाकिस्तान आणि न्यूझीलंडचा सराव सामना होणार आहे. पण पाकिस्तान क्रिकेट संघात सध्या खळबळ माजली आहे. पाकिस्तान  क्रिकेटर्सना गेल्या चार महिन्यांपासून मॅच फीच देण्यात आलेली नसल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे खेळाडूंमध्ये नाराजी असून विश्वचषक स्पर्धेदरम्यान (ODI World Cup-2023) टी-शर्टवर स्पॉन्सर्सच्या लोगोवर बहिष्कार टाकण्याची शक्यता आहे. 


वार्षिक करारावरुन वाद
क्रिकेट पाकिस्तानने दिलेल्या माहितीनुसार पाकिस्तान क्रिकेट संघातील खेळाडू सेंट्रेल कॉन्ट्रॅक्टशिवाय विश्वचषक स्पर्धा खेळणार आहेत. पाकिस्तान क्रिकेट संघ 26 स्पटेंबरला पाकिस्तानातू दुबईला रवाना होईल, त्यानंतर तिथून हैदराबादमध्ये पोहोचेल. खेळाडूंच्या वार्षिक करारावरुन (Central Contract) पीसीबी (Pakistan Cricket Board) आणि खेळाडूंमध्ये वाद सुरु आहे. 


खेळाडूंनी ठेवल्या अटी
क्रिकेट पाकिस्तानने दिलेल्या माहितीनुसार खेळाडू मोफत खेळण्यास तयार आहेत. पण त्यांनी पाकिस्ता क्रिकेट बोर्डासमोर (PCB) एक अट ठेवली आहे. पैसे मिळत नसतीलतर स्पॉन्सर्सचं प्रमोशन करणार नाही असं क्रिकेटपटूंचं म्हणणं आहे. प्रमोशनल इव्हेंटही करणार नसल्याचा पवित्रा खेळाडूंनी घेतला आहे. इतकंच नाही तर विश्वचषक स्पर्धेदरम्यान आयसीसीच्या कमर्शियल इव्हेंटपासूनही पाकिस्तान क्रिकेट खेळाडू लांब राहू शकतात.


प्रत्येक महिन्याला मिळतात इतके पैसे
पाकिस्तान क्रिकेट बोर्ड आणि पाकिस्तान खेळाडूंमध्ये (Pakistani Cricketers) झालेल्या वार्षिक करारानुसार क्रिकेटचे तीनही फॉर्मेट खेळण्यासाठी टॉप क्रिकेटर्सना दर महिन्याला 13 लाख रुपये मिळतात. पण टॅक्स आणि इतर गोष्टी कापून खेळाडूंच्या हातात महिन्याल फक्त 6,60 हजार रुपये पडतात. त्यामुळे खेळाडूंनी फिस वाढवून देण्याची मागणी केली आहे.