Pakistan Super League: 20 वर्षाची पोरगं अन् 160 ची स्पीड, पाकिस्तानला मिळाला नवा `शोएब अख्तर`
PSL 2023: इहसानुल्लाहने (Ihsanullah) क्वेटा ग्लॅडिएटर्सविरुद्धच्या (Multan Sultan VS Quetta Gladiators) सामन्यात या गोलंदाजाने केवळ 12 धावांत 5 विकेट घेतल्या होत्या.
Ihsanullah, PSL 2023: पाकिस्तान सुपर लीग (PSL) च्या 8 व्या हंगामातील सामन्यांना दणक्यात सुरूवात झाली आहे. या हंगामात वेगवान गोलंदाज इहसानुल्लाहने (Ihsanullah) घातक गोलंदाजी करत प्रतिस्पर्धी खेळाडूंचं कंबरडं मोडलंय. बाबर आझम (Babar Azam) असो वा मोहम्मद रिझवान (Mohammad Rizwan) पठ्ठ्यासमोर कोणच टिकलं नाही. वेगवान गोलंदाज इहसानुल्लाह सध्या पाकिस्तानच्या लीगमध्ये मुलतान सुलतान (Multan Sultan) संघाकडून खेळतो.
इहसानुल्लाहने क्वेटा ग्लॅडिएटर्सविरुद्धच्या (Multan Sultan VS Quetta Gladiators) सामन्यात या गोलंदाजाने केवळ 12 धावांत 5 विकेट घेतल्या होत्या. एहसानुल्लाहने क्वेटाचा कर्णधार सर्फराज अहमद ज्या चेंडूवर गोलंदाजी केली त्याचा वेग 150 किमी/तास होता. त्यावरून तुम्ही त्याच्या स्पीडचा अंदाज लावू शकता. इहसानुल्लाहने आतापर्यंत पीएसएलच्या (PSL 2023) 3 सामन्यात 10 विकेट घेतल्या आहेत.
आणखी वाचा - IND vs AUS 2nd Test : के एल राहूलचा पत्ता कट? राहूल द्रविड स्पष्टच म्हणाला...
माजी अष्टपैलू अब्दुल रज्जाक (Abdul Razzaq) याने दावा केलाय की इहसानुल्लाह एक दिवस नक्कीच 160 च्या स्पीडने बॉलिंग करू शकतो. त्याच्या वेगाने जगभरातील फलंदाजांना आश्चर्यचकित होतील. इहसानुल्लाह आपल्या वेगवान गोलंदाजीने विरोधी फलंदाजाचा घाम काढू शकतो. आम्ही त्यावर काम केल्यास, मला खात्री आहे की, ते 160 किमी प्रतितास वेगाने तो भारताविरुद्ध खेळेल, असं अब्दुल रज्जाकने म्हटलं आहे.
Ihsanullah आहे तरी कोण?
दरम्यान, इहसानुल्लाहचा जन्म पाकिस्तानच्या उत्तरेकडील स्वात खोऱ्यातील अरकोट गावात झाला. मागील वर्षी 2022 मध्ये पाकिस्तानात आलेल्या भीषण पुरात इहसानुल्लाहचं घर वाहून गेलं होतं. या पुरामुळे पाकिस्तानात लाखो लोक बाधित झाले आहेत. मात्र, हिंमत न हारता त्याने पुन्हा जोरदार मुसंडी मारली आणि पीएलएलमध्ये आपलं स्थान निश्चित केलं. इहसानुल्लाहला कराची किंग्ज, लाहोर कलंदर आणि मुलतान सुलतान या तीन फ्रँचायझींच्या ऑफर मिळाल्या.
दरम्यान, इहसानुल्लाहने क्वेटा ग्लॅडिएटर्स विरुद्ध 5 विकेट्स घेतल्यात. तर लाहोर कलंदर्स विरुद्ध 2 विकेट्स घेऊन त्याने संघाला विजयी आघाडी मिळवून गिली. त्याचबरोबर 17 फेब्रुवारी रोजी पेशावर झाल्मी विरुद्धच्या सामन्यात त्याने 3 बळी घेतले आणि आपल्या स्पीडची जादू दिसून आली. इहसानुल्लाला भारताविरुद्धच्या विश्वचषकात पदार्पणातच 5 विकेट घ्यायच्या आहेत. अशी इच्छा त्याने व्यक्त करून दाखवली होती.