मुंबई : टीम इंडियाचा माजी कर्णधार सौरव गांगुली महिला क्रिकेट टीममधून सगळ्यात सिनिअर खेळाडू मिताली राजला इंग्लंडविरुद्धच्या टी20 वर्ल्डकप सेमीफायनलमध्ये बाहेर ठेवल्याने हैरान नाही आहे. त्य़ाने म्हटलं की, तो जेव्हा त्याच्या करिअरच्या उच्च स्तरावर होतो तेव्हा देखील त्याला टीममधून बाहेर ठेवण्यात आलं होतं. वनडे टीमची कर्णधार मितालीने पाकिस्तान आणि आयरलँड विरुद्ध अर्धशतक ठोकले पण तरी तिला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात विश्रांती देण्यात आली. त्यानंतर इंग्लंड विरुद्धच्या सेमीफायनलमध्ये देखील तिला संधी नाही देण्यात आली. या सामन्यात भारताला 8 विकेटने पराभव स्विकारावा लागला.


मितालीबाबत वक्तव्य


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गांगुलीने म्हटलं की, 'भारताचा कर्णधार असताना देखील त्याला बाहेर बसावं लागलं होतं. जेव्हा मी पाहिलं की मिताली राजला टीम बाहेर ठेवण्यात आलं आहे. तेव्हा मी म्हटलं की, या ग्रुपमध्ये तुझं स्वागत आहे. या 46 वर्षाच्या खेळाडूने पाकिस्तानच्या विरुद्ध 2006 मध्ये खेळल्या गेलेल्या दुसऱ्या टेस्ट सामन्याच्या आठवणी जाग्या करत म्हटलं की, कर्णधारांना बाहेर बसण्यासाठी सांगितलं तर तसं करा. मी फैसलाबादमध्ये असंच केलं होतं. मी 15 महिने वनडे नाही खेळलो. पण तेव्हा मी वनडेमध्ये चांगली कामगिरी करत होतो. जीवनात असं होतं. कधी-कधी जगात तुम्हाला बाहेरचा रस्ता दाखवला जातो.'


सौरव गांगुलीने पुढे हे देखील म्हटलं की, मितालीसाठी रस्ते अजून बंद झालेले नाहीत.


धोनीबाबत ही वक्तव्य


गांगुलीने धोनीबाबत वक्तव्य करताना म्हटलं की, 'धोनी आजही मोठे सिक्स मारु शकतो. तो चॅम्पियन आहे आणि टी-20 वर्ल्डकपचा खिताब जिंकणल्यानंतरचा 12-13 वर्षाचं क्रिकेट करियर शानदार आहे. तुमचं वय किती ही झालं तरी तुम्हाला चांगली कामगिरी करावीच लागते. नाहीतर तुमची जागा दुसरं कोणी घेतं. मी त्याला पुढच्या सिरीजसाठी शुभेच्छा देतो. कारण माझी अशी इच्छा आहे की, या चॅम्पियनने पुन्हा एकदा आपल्या करिअरच्या उच्चतम शिखरावर पोहोचावं. तो एक शानदार क्रिकेटर आहे.'


विराटबाबत ही वक्तव्य


गांगुलीने म्हटलं की, 'विराट एक शानदार क्रिकेटर आहे. भारतीय टीमला त्याच्या सारख्या कर्णधाराची गरज आहे. मी आता सिलेक्टर नसलो तरी असं वाटतं की, 2019 वर्ल्डकपमध्ये आता असलेले 90 टक्के खेळाडू तरी असतीलच.'