BCCI Apex Council Meeting : टीम इंडिया सध्या वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर आहे. यंदाच्या वर्षी एकदिवसीय वर्ल्डकप 2023 खेळवला जाणार असून भारत याचा आयोजन आहे. यामध्ये आयसीसी स्पर्धेत 10 टीम सहभागी होणार आहे. दरम्यान यापूर्वीच भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या ( बीसीसीआय ) अपेक्स काऊंसिलची बैठक झाली. यामध्ये 'इम्पॅक्ट प्लेअर'बाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. जाणून घेऊया बीसीसीआयचा हा नियम नेमका काय आहे?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यंदाच्या इंडियन प्रीमियर लीगमध्ये (IPL) 'इम्पॅक्ट प्लेयर' नियम लागू करण्यात आला होता. त्यानंतर आता 16 ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या सय्यद मुश्ताक अली T20 ट्रॉफीमध्येही या नियम लागू केला जाणार आहे. बीसीसीआयच्या अपेक्स काऊंसिलने शुक्रवारी याला मंजुरी दिली. 


मुख्य इम्पॅक्ट प्लेयरचा नियम हा गेल्या सय्यद मुश्ताक अली T20 ट्रॉफीमध्ये लागू करण्यात आला होता. परंतु खेळाडूला 14 व्या ओव्हरच्या आधी किंवा त्यापूर्वीच आणावं लागत होतं. तसंच त्या खेळाडूचं नाव टॉस होण्यापूर्वीच जाहीर करावं लागायचं.


तसंच या नियमांमध्ये एका ओव्हरमध्ये बाऊन्सर टाकण्याच्या मर्यादेबाबतही मोठा निर्णय घेण्यात आलाय. बीसीसीआयने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीसाठी नियमात मोठा बदल केलाय. आतापर्यंतच्या नियमांनुसार, मर्यादित ओव्हर्सच्या सामन्यात गोलंदाज एका ओव्हरमध्ये एकच बाऊन्सर टाकू शकतो. मात्र आता यांची संख्या वाढवून ती 2 करण्यात आली आहे. त्यानुसार आता, सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीच्या पुढील सिझनमध्ये एका ओव्हरमध्ये दोन बाऊन्सर टाकण्याची परवानगी असेल.


हा नियम आयपीएलच्या पुढील सिझनमध्ये लागू केला जाऊ शकतो. सध्या तो फक्त सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्येच लागू आहे. खेळात संतुलन निर्माण करण्यासाठी हा नियम लागू करण्यात येत आहे. आतापर्यंत बाऊन्सरबाबत असा नियम होता की, जर फलंदाजाने एका ओव्हरमध्ये एकापेक्षा जास्त बाउन्सर फेकले तर तो नो बॉल मानला जात होता. 


फलंदाजांच्या अडचणीत वाढ


बाउन्सर बॉलचा फलंदाजांना सामना करणं खूप कठीण जातं. सय्यद मुश्कत अली ट्रॉफीमध्ये आता गोलंदाजांना एका ओव्हरमध्ये 2 बाऊन्सर टाकता येणार आहेत. त्यामुळे त्याला फलंदाजांना अडचणीत आणण्याची पुरेशी संधी गोलंदाजांना मिळणार आहे. त्यामुळे फलंदाजांच्या अडचणींमध्ये काही प्रमाणात वाढ होणार आहे.