Chetan Sharma On Jasprit Bumrah: टीम इंडियाचा (Team India) प्रमुख स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) दुखापतीमुळे गेला बराच कालावधी टीम इंडियापासून दूर आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या शेवटच्या दोन कसोटी सामन्यात बुमराह खेळेल अशी शक्यता वर्तवण्यात आली होती. पण दुखापतीमुळे त्याची संघात निवड करण्यात आली नाही. आता बुमराहच्या दुखापतीबाबत एक मोठा खुलासा झाला आहे. झी मीडियाने केलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये (Sting Operation) बीसीसीआय (BCCI) निवड समितीचे अध्यक्ष चेतन शर्मा (Chetan Sharma) यांनी याबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बुमराहचं सर्वात मोठं खोटं समोर आलं!
टीम इंडियाचा स्टार बॉलर जसप्रीत बुमराहची कमी एशिया कप (Asia Cup) ते वर्ल्ड कपपर्यंत (T20 World Cup) संघाला जाणवली. पण बुमराहच्या दुखापतीची (Injury) खरी कहाणी चेतन शर्मा यांनी उघड केली आहे. T20 वर्ल्ड कप 2022 पूर्वी टीम इंडिया ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीन सामन्यांची मालिका खेळली. बुमराह फिट असल्याने तिसऱ्या सामन्यात त्याला खेळवण्याचा आम्ही विचार केला. पण राहुल द्रविड आणि रोहित शर्मा यांना बुमराह दुसऱ्याच सामन्यात हवा होता, तिसऱ्या सामन्यात त्याला विश्रांती देण्यात यावी असं त्यांना वाटत होतं. पण बुमराहला पहिला सामना खेळायचा होता. 


बुमराहची चेतन शर्मांबरोबर चर्चा
यासंदर्भात चेतन शर्मा आणि जसप्रीत बुमराह यांच्याच चर्चा झाली. त्यानुसार बुमराहला पहिला सामना खेळायचा होता. चेतन शर्मा यांनी केलेल्या दाव्यानुसार त्यांनी तसं चेतन शर्मा यांना सांगितलं. पण चेतन शर्मा यांनी त्याला सांगितलं की तुला पहिला सामना खेळता येणार नाही, दुसरा सामना खेळावा लागेल.  


दुखापतीनंतरही बुमराहला खेळायचं होतं
बुमराहला दुखापत झाली होती. पण तो संघातलं आपलं स्थान जाऊ नये यासाठी तो आपण फिट असल्याचा दावा करत होता. अनफिट असतानाही तो दुसरा सामना खेळला. परिणामी या सामन्यात त्याने 4  सामन्यात तब्बल 50 धावा दिल्या, त्याला एकही विकेट घेता आली नाही. बुमराहची दुखापत मोठी होती आणि तोंडावर वर्ल्ड कप स्पर्धा आली होती. बुमराह स्वत:ला फिट म्हणत असला तरी आम्ही त्याची पुन्हा तपासणी करण्याचं ठरवलं. त्याच्या पायाचं स्कॅन करण्यात आलं. याचा धक्कादायक रिपोर्ट आला. त्याची दुखापत गंभीर होती, आणि त्याच अवस्थेत तो खेळवला असतं तर दुखापत बळावण्याची शक्यता होती. जर दुखापत वाढली असती तर कमीत कमी त्याला वर्षभर खेळता आलं नसतं. त्यामुळे निवड समितीसमोर मोठा प्रश्न उभा राहिला.


बुमराह अखेर वर्ल्ड कपमधून बाहेर
चेतन शर्मा यांनी केलेल्या दाव्यानुसार बुमराहची दुखापत गंभीर होती. त्यानंतर टीम मॅनेजमेंटने त्याला वर्ल्ड कपमधून विश्रांती देण्याचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात टीम इंडियाचा प्रमुख खेळाडू होता, पण तो पूर्णपणे फिट नव्हता. पण त्यानंतरही त्याला खेळवण्यात आलं. परिणामी तो अजूनही दुखापतीतून पूर्णपणे सावरु शकलेला नाही. जे खेळाडू 100 टक्के फिट नाहीत, ते देखील इंजेक्शन देऊन फिट असल्याचं दाखवतात, असा गौप्यस्फोट चेतन शर्मा यांनी केला आहे.  फिट नसतानाही खेळाडू फिट असल्याचा दावा का करतायत हा प्रश्न आता यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.   फिट नसतानाही खेळाडू फिट असल्याचा दावा का करतायत हा प्रश्न आता यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.