Suryakumar Yadav : अफगाणिस्तानविरुद्धची मालिका टीम इंडियाने (Team India) 3-0 अशी जिंकलीय आणि आता भारतीय क्रिकेट संघ जूनमध्ये होणाऱ्या टी20 विश्वचषकाच्या तयारीला लागला आहे. यादरम्यान टीम इंडियाला गुडन्यूज मिळालीय. टी20 स्पेशलिस्ट फलंदाज सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) लवकरच मैदानावर परतणार आहे. जर्मनीत सूर्याच्या मांडीवर यशस्वी शस्त्रक्रिया (Groin Surgery) झाली असून पुढच्या आठवड्यात तो भारतात परतणार आहे. भारतात आल्यानंतर सूर्यकुमार बंगळुरुमधल्या नॅशनल क्रिकेट अकॅडमीत (National Cricket Academy) सराव करेल. आयपीएलपर्यंत सूर्यकुमार यादव पूर्णपण तंदरुस्त होईल अशी शक्यता बीसीसीआयने वर्तवली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जर्मनीत झाली शस्त्रक्रिया
जगातला नंबर वन टी20 फलंदाज सूर्यकुमार यादववर बुधवारी जर्मनीतल्या म्यूनिकमध्ये तज्ज्ञ डॉक्टरांच्या निगरानीखाली शस्त्रक्रिया पार पडली. 2022 मध्ये केएल राहुलवरही म्यूनिखमध्ये हर्नियाची शस्त्रक्रिया झाली होती. शस्त्रक्रियेच्या एक महिन्यानंतर राहुल पुन्हा मैदानावर उतरला होता. पण सूर्याला पूर्णपणे फिट होण्यासाठी जवळपास दोन महिन्यांचा अवधी लागण्याची शक्यता आहे. 


दक्षिण आफ्रिकेत पायावर शस्त्रक्रिया
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी20 आंतरराष्ट्रीय सामना खेळताना सूर्यकुमार यादव दुखापतग्रस्त झाला होता. फिल्डिंग करताना त्याच्या पायाला दुखाफत झाली. यानंतर त्याच्या पायावर छोटीसी शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर आता जर्मनीत स्पोर्ट्स हार्नियाची शस्त्रक्रिया करण्यात आली. सलग दोन शस्त्रक्रियेमुळे पूर्णपणे तंदरुस्त होण्यात सूर्या दोन महिने लागू शकतात असं डॉक्टरांचं म्हणणं आहे. 


आयपीएलपर्यंत पूर्णपणे फिट
क्रिकबजच्या बातमीमुसार सूर्यकुमार यादव आयपीएलच्या (IPL 2024) सतराव्या हंगामापर्यंत पूर्णपणे फिट होईल. मार्चच्या शेवटच्या महिन्यात आयपीएल स्पर्धेला सुरुवात होईल. त्यानंतर लगेचच म्हणजे एक जूनपासून वेस्टइंडिज आणि अमेरिकेत टी20 विश्वचषक (T20 World Cup) खेळवला जाणार आहे. या स्पर्धेसाठीही सूर्यकुमारचा टीम इंडियाच्या संघात समावेश केला जाईल. 


नॅशल क्रिकेट अॅकेडमीत याआधी जसप्रीत बुमराह, श्रेयस अय्यर आणि केएल राहुल यांच्यावरही सर्जी झाली आहे. बुमराह तर अनेक महिने क्रिकेटपासून दूर होता. आयसीसी एकदिवसीय विश्वचषकापूर्वी बुमराह फिट झाला. 


टी20 क्रमवारीत नंबर वन
दुखापतीमुळे गेले काही महिने टी20 क्रिकेटपासून दूर असूनही सूर्यकुमार यादव आयसीसी टी20 क्रमवारीत पहिल्या स्थानावर आहे. भारतासाठी सूर्यकुमार यादव आतापर्यंत 60 आंतरराष्ट्रीय टी20 सामने खेळला आहे. 2141 धावा केल्या असून यात त्याने तब्बल चार शतकं लगावली आहेत. टी20 क्रिकेटमध्ये 117 ही त्याची सर्वोत्तम धावसंख्या आहे.