Cricket : आयपीएलचा (IPL 2023) सोळावा हंगाम आता निर्णायक टप्प्याकडे आला आहे. लीग सामने जवळपास संपत आले आहेत आणि आता प्ले ऑफची (Play Off) उत्सुकता क्रिकेट चाहत्यांना लागली आहे. येत्या 28 मेला आयपीएलचा अंतिम सामना (IPL Final Match) रंगणार आहे. आयपीएलच्या प्रत्येक सामन्यासाठी स्टेडिअममध्ये तुफान गर्दी होते. टीव्हीवरही लाखो क्रिकेट चाहते सामना पाहात असतात. क्रिकेट चाहत्यांना सामन्यादरम्यान काही मजेशीर प्रश्नही विचारले जातात. सध्या असाच एक प्रश्न टीम इंडियाचा (Team India) माजी क्रिकेटपटू इरफान पठाण (Irfan Pathan) यांनी आपल्या चाहत्यांना विचारला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोशल मीडियावर जूना फोटो व्हायरल
इरफान पठाणने आपल्या इन्स्टाग्रामवर अकाऊंटवर (Instagram) जुन्या काळातील एक फोटो शेअर (Old Photo) केला आहे. हा फोटो शेअर करत इरफानने क्रिकेट चाहत्यांना त्यातील खेळाडू ओळखण्याचं  आव्हान केलं आहे. भारतातील दिग्गज क्रिकेटपटूंमध्ये इरफान पठाणचा समावेश होतो. आपल्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर इरफानने टीम इंडियाला अनेक सानने जिंकून दिले आहे. इरफान पठाण सध्य आयपीएलमध्ये हिंदी समालोचकाची भूमिका बजावतेय.


भारतीय संघातील खेळाडू
ऑलराऊंडर इरफान पठाणने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो 2002 मध्ये इंग्लंड दौऱ्यावर गेलेल्या अंडर-19 भारतीय क्रिकेट संघाचा आहे (Under-19 Team India). या फोटोतील काही खेळाडू पुढे टीम इंडियासाठीही खेळले. इतंकच नाही तर आपल्या दमदार कामगिरीच्या जोरावर दिग्गज क्रिकेटपटूंच्या यादीत समाविष्ठ झाले. तर काही खेळाडूंनी आयपीएलमध्ये चमकदार कामगिरी केलीय. 


इरफान पठाणची पोस्ट
हा फोटो शेअर करत पठाणने एक कॅप्शनही दिला आहे. यात त्याने म्हटलंय, इंग्लंड दौऱ्यावर गेलेली अंडर-19 भारतीय टीम! यातले काही खेळाडू भारतीय संघात खेळले तर काही खेळाडू आयपीएलमध्ये आले. तुम्ही मलाही यात शोधू शकता? इतर खेळाडूही ओळखता येतात का पाहा?


भारताचे दिग्गज खेळाडू
इरफान पठाणने शेअर केलेल्या या फोटोत मागच्या रांगेत इरफान पठाण उभा असलेला दिसोतय. त्याच्याशिवाय या संघात सुरेश रैना, अम्बाती रायडू, मनविंद बिस्ल्ला, पॉल वल्थाटी या खेळाडूंचाही समावेश आहे. त्यावेळी इंग्लंड दौऱ्यावर गेलेला भारतीय संघ इंग्लंडबरोबर तीन कसोटी सामने आणि तीन एकदिवसीय सामने खेळला होता. यापैकी कसोटी मालिकेत भारताने इंग्लंडवर 1-0 अशी मात दिली होती. तर इंग्लंडने एकदिवसीय मालिका 3-0 अशी जिंकली होती. 



इरफानची क्रिकेट कारकिर्द
2007 आयसीसी टी20 वर्ल्ड कप आणि 2013 आयीसी चॅम्पियन्स चषक जिंकणाऱ्या भारतीय संघाचा इरफान पठाण एक भाग होता. वयाच्या 19 व्या वर्षी इरफानने टीम इंडियात एन्ट्री केली. 2006 मध्ये कसोटी सामन्याच्या पहिल्यात षटकात हॅटट्रीक घेणारा तो पहिला खेळाडू ठरला. आयपीएलमध्ये 2008 च्या पहिल्या हंगामात तो किंग्स इलेव्हन पंजाबकडून खेळला होता.