India vs England 2nd Test: विशाखापट्टणम कसोटीत टीम इंडियाने इंग्लंडवर सामन्याच्या चौथ्याच दिवशी 106 धावांनी मात केली. या विजयाबरोबरच भारताने पाच सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली आहे (India beat England) भारताने इंग्लंडसमोर विजयासाठी 399 धावांचं आव्हान ठेवलं होतं. पण इंग्लंडचा दुसरा डाव 292 धावांवर आटोपला. जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) आणि आर अश्विनने (R Ashwin) इंग्लंडच्या डावाला खिंडार पाडलं. दोघांनी प्रत्येकी तीन विकेट घेतल्या. दुसऱ्या डावात आणखी एका कामगिरीने क्रिकेट चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं. टीम इंजियाचा कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) पकडलेल्या एका कॅचचा व्हिडिो सोशल मीडियावर सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. फिरकी गोलंदाज आर अश्विनच्या गोलंदाजीवर रोहित शर्माने डोळ्यांची पापणी लवण्याआधीच अप्रतीम कॅच झेलला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

0.45 सेकंदात पकडला कॅच
इंग्लंडच्या दुसऱ्या डावात 29 व्या षटकात कर्णधार रोहित शर्माने चेंडू फिरकी गोलंदाज आर अश्विनच्या हातात सोपावला. अश्विनच्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर इंग्लंडचा फलंदाज ओली पोपने फटका मारण्याचा प्रयत्न केला. पण चेंडू त्याच्या बॅटची कडा घेऊन स्लीपमध्ये गेला. स्लीपमध्ये उभा असलेल्या रोहित शर्माने डोळ्यांची पापणी लवते न लवते तोच हा अवघड कॅच टिपला. अवघ्या 0.45 सेकंदात रोहितने हा कॅच झेलला. रोहित शर्माची ही चपळाई पाहून त्याच्या फिटनेस आणि वयावर टीका करणाऱ्यांसाठी चोख उत्तर आहे. 


रोहित शर्माची चपळाई पाहून ओली पोपलाही धक्का बसला. स्वत: आर अश्विनही रोहित शर्माचा कॅच पाहून हैराण झाला. सोशल मीडियावर रोहित शर्माच्य या कॅचचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. रोहित शर्माचा हा कॅच विशाखापट्टणम कसोटी सामन्याचा टर्निंग पॉईंट ठरला. ओली पोप हा इंग्लंडचा धोकादायक फलंदाज आहे. तो मैदानावर टिकला असता तर टीम इंडियाला विजयासाठी आणखी झगडावं लागलं आहे. ओली पोपने 21 चेंडूत 23 धावा केल्या. यात त्याने 5 चौकार मारले. 



टीम इंडियाचा शानदार विजय
हैदराबाद कसोटी सामन्यात इंग्लंडने भारतावर 28 धावांनी मात केली होती. या पराभवाचा बदला घेण्यासाठी रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया विशाखापट्टणम कसोटी उतरली. पण सामन्याच्या सुरुवातीलाच टीम इंडियाला दोन मोठे धक्के बसले. टीम इंडियाचा ऑलराऊंडर रवींद्र जडेजा आणि फलंदाज-विकेटकिपर केएल राहुल दुखापतीमुळे बाहेर पडले. त्यामुळे युवा खेळाडूंना घेऊन टीम इंडिया मैदानात उतरली. या युवा खेळाडूंनीच इंग्लंडच्या संघाला घाम फोडला. पहिल्या इनिंगमध्ये यशस्वी जयस्वालने दुहेरी शतक करत भारताला भक्कम पाया रचून दिला. तर दुसऱ्या इनिंगमध्ये शुभमन गिलने शतकी खेळी करत इंग्लंडसमोर बलाढ्य विजयाचं आव्हान ठेवलं. 


युवा फलंदाजांच्या या कामगिरीला अनुभवी गोलंदाजांची साथ मिळाली. भारताचा प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुहमराने पहिल्या इनिंगमध्ये अवघ्या 45 धावात 6 विकेट घेत इंग्लंडचं कंबरडं मोडलं. तर दुसऱ्या डावातही त्याने 3 विकेट घेत टीम इंडियाच्या विजयात मोलाची भूमिका बजावली. दिग्गज अनुभवी गोलंदाज आर अश्विननेही या सामन्यात 3 विकेट घेतल्या.